कोल्हापुरात फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात राडा, मालोजीराजे छत्रपती यांनी केली मध्यस्थी

Dispute between two teams in football tournament in Kolhapur
कोल्हापुरात फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात राडा, मालोजीराजे छत्रपती यांनी केली मध्यस्थी

कोल्हापूर शहरात लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वानिनित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा शाहू स्टेडीयमवर सुरू आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामना आज (गुरूवार) खेळवला गेला. या सामन्यात खेळाडूंमध्ये वादावादी झाले. पीटीएम आणि शिवाजी मंडळ यांच्यात हा सामना सुरू होता. यावेळी बॉल पासिंगवरून वाद झाला.

पीटीएम आणि शिवाजी मंडळ यांच्यात हा सामना सुरू होता. या वेळी बॉल पासिंगवरून झालेल्या वादात प्रशिक्षकही उतरले. त्यावेळी प्रशिक्षकांबरोबर प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंची बाचाबाची झाली. खेळाडू परस्परांना भिडले आणि धक्काबुक्की झाली. मैदानात वाद वाढल्याचे पाहून छत्रपती मोलोजीराजे मध्यस्थी करण्यासाठी मैदानात उतरेले.

छत्रपती मोलोजीराजे अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. या वादामुळे पंचांनी मैदानावरील दोन्ही संघाकडील एका खेळाडूला रेड कार्ड दाखवले.