जागतिक महिला दिनानिमित्त २०० विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने श्री राधा फाऊंडेशन आणि खासदार राहुल शेवाळे यांच्यातर्फे शनिवारी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात २०० विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात आले.

मुंबई : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने श्री राधा फाऊंडेशन आणि खासदार राहुल शेवाळे यांच्यातर्फे शनिवारी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात २०० विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात आले. यावेळी, शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या आई वीरमाता अनुराधा गोरे, समाजसेविका पद्मा कपूर, कॅन्सर रुग्णांसाठी आपलं राहतं घर देणाऱ्या सोमा सिन्हा आणि ज्येष्ठ कायदेतज्ञ चित्रा साळुंके यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. (Distribution of free bicycles to 200 female students on the occasion of International Womens Day)

स्वयंरोजगार आणि शासकीय योजना याबाबत उप संचालिका कीर्ती देशमुख यांनी माहिती दिली. तसेच ॲडव्होकेट चित्रा साळुंके यांनी महिला सबलीकरण आणि कायदा याविषयी मार्गदर्शन केले. श्री राधा फाऊंडेशनच्या महिला दिनाच्या कार्यक्रमाला माता- भगिनींचा उदंड प्रतिसाद लाभला, अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

शिवसेनेचे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) आमदार सदा सरवणकर, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे, उपनेत्या आशा मामेडी, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर, विभागप्रमुख गिरीश धानुरकर, अविनाश राणे, महिला विभागप्रमुख प्रिया गुरव, सुनिता वैती यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.


हेही वाचा – ही चांगली गोष्ट नाही बरं का…महाराष्ट्रासाठी! मनसेचा गुढीपाडवा मेळाव्याचा दुसरा टीझर लॉन्च