घरताज्या घडामोडीसमाज कल्याण विभागाच्या वसतीगृहांमध्ये सॅनिटायझरचे वाटप

समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहांमध्ये सॅनिटायझरचे वाटप

Subscribe

छात्र भारतीच्या मागणीनंतर धनंजय मुंडे यांनी दिले कार्यवाहीचे आदेश

समाज कल्याण विभाग अंतर्गत येणाऱ्या मुंबई, पुणेसह राज्यभरातील सर्व वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मोफत सॅनिटायझर देण्याबाबत आज सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. छात्र भारतीचे राज्य संघटक सचिन बनसोडे यांनी करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी विधान भवनात धनंजय मुंडे यांची भेट घेत विनंती केली होती.

राज्यात कोरोना व्हायरसची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. त्याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. म्हणून राज्यभरातील समाज कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या वसतीगृहातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत सॅनिटायझर आणि मास्क पुरवण्याबाबत बनसोडे यांनी निवदेनाद्वारे मंत्री मुंडे यांच्याकडे मागणी केली होती. मुंडे यांनी मागणीची तत्काळ दखल घेत समाज कल्याण विभागाचे सहसचिव व कक्ष अधिकारी यांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – अधिवेशन आटोपलं, पण आता दिशा कायद्याचं काय होणार? गृहमंत्र्यांची घोषणा!


धनंजय मुंडे यांनी तत्काळ दखल घेत कार्यवाहीचे आदेश दिल्याबद्दल सचिन बनसोडे यांनी मंत्री महोदयांचे आभार मानले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असणारी भिती कमी होऊन त्यांना दिलासा मिळेल असे मत बनसोडे यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -