Monday, February 15, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी 5 एप्रिलला

जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी 5 एप्रिलला

Related Story

- Advertisement -

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी विविध कार्यकारी सोसायट्यांच्या सभासदांचे ठराव 22 फेब्रुवारीपर्यंत मागवण्यात आले आहेत. त्यांची अंतिम मतदार यादी 5 एप्रिल रोजी प्रसिध्द केली जाणार आहे.
वर्षभरापूर्वी मुदत संपलेल्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची ही पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी संस्था सभासदांचे ठराव मागविण्यात येत आहेत. याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांना प्राप्त झालेल्या संस्थांचे ठराव हे 23 फेब्रुवारीपर्यंत बँकेला द्यावे. त्याआधारे बँकेला 2 मार्च रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करावी लागेल. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी 12 मार्च रोजी ही यादी प्रसिध्द करावी. त्यावर हरकती नोंदवण्यासाठी 22 मार्चपर्यंत मुदत असणार आहे. 31 मार्च 2021 पर्यंत या हरकती निकाली काढण्याची अंतिम मुदत आहे. सर्व हरकतींचा निपटारा झाल्यानंतर 5 एप्रिल रोजी प्रसिध्द केली जाणार असल्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी दिले आहेत.
निवडणूक कार्यक्रम
22 फेब्रुवारी : सभासद संस्थांचे ठराव
23 फेब्रुवारी : प्राप्त संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव बँकेला देणे
2 मार्च : जिल्हा बँकेने प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे
12 मार्च : जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे
22 मार्च : प्रारुप मतदार यादीवर आक्षेप
31 मार्च : प्राप्त आक्षेपांवर निर्णय घेणे
5 एप्रिल : अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे

- Advertisement -