घरताज्या घडामोडीरत्नागिरीतील Delta Plus रुग्णांबाबत जिल्हाधिकारीच अनभिज्ञ

रत्नागिरीतील Delta Plus रुग्णांबाबत जिल्हाधिकारीच अनभिज्ञ

Subscribe

ज्या जिल्हाधिकाऱ्याला आपल्याच जिल्ह्यात वाढत असलेल्या डेल्टा प्लसच्या रुग्णांची माहिती नसेल तर ते जिल्हाधिकारी जनतेला कसं वाचवणार?

देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या ( Delta Plus variant ) बाधित रुग्णांची संख्या ४० इतकी झाली आहे. डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातील जळगाव आणि रत्नागिरीत होते. त्यातही जळगावच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. रत्नागिरीत सद्या ९ डेल्टा प्लसचे रुग्ण आहेत. मात्र ज्यांच्यांकडे रत्नागिरीच्या प्रशासनाची धोरणे दिली आहेत त्या रत्नागिरीच्या जिल्हाधिकारीच आपल्या जिल्ह्यातील डेल्टा प्लसच्या रुग्णांबाबत अनभिज्ञ आहेत. माझ्याकडे डेल्टा प्लस बाधित रुग्णांची कोणतीही माहिती उपलब्ध नाही अशी धक्कादायक प्रतिक्रिया रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. ज्या जिल्हाधिकाऱ्याला आपल्याच जिल्ह्यात वाढत असलेल्या डेल्टा प्लसच्या रुग्णांची माहिती नसेल तर ते जिल्हाधिकारी जनतेला कसं वाचवणार? कशी जनजागृती करणार? असा प्रश्न आता रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बाबतीत उपस्थित केला जात आहे. (District Collector of Ratnagiri Laxminarayan Mishra ignorant about Delta Plus variant patients in Ratnagiri)

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसांपूर्वी डेल्टा प्लस व्हेरिएंट बाबत माहिती दिली होती. त्याचप्रमाणे काल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देखील डेल्टा प्लस व्हेरिएंटची माहिती देण्यात आली होती. ज्यावेळी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या उपाययोजनांविषयी विचारले असता डेल्टा प्लस व्हेरिएंट रत्नागिरी जिल्ह्यात असल्याची मला अद्याप कोणतीही माहिती नसल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. त्यानंतर जिल्हा मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याबाबत भाष्य करण्यास नकार दिल्याचे समोर येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या वक्तव्यामुळे काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे.

- Advertisement -

राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण आढळले असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. १५ मे नंतर सुमारे साडेसात हजार सॅम्पल्स घेण्यात आले आहेत. या सॅम्पल्स वर न थांबता प्रति जिल्हा १०० सॅम्पल्स गोळा करण्याचा विचार करत करण्यात आला. त्याचप्रमाणे डेल्टा प्लस व्हेरिएंट आणखी कोणत्या जिल्ह्यात पसरला आहे का याबाबतची खातरजमा करण्यात येत आहे. रत्नागिरीत ९, जळगावमध्ये ७,मुंबईत २, पालघर १,सिंधुदूर्गात१ आणि ठाणे जिल्ह्यात १ असे मिळून २१ डेल्टा प्लस बाधित रुग्ण समोर आले आहेत. या रुग्णांचा डिटेल अभ्यास करण्याचे काम सुरु असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितेल आहे.


हेही वाचा – चिंता वाढली! देशातील Delta Plus बाधितांची संख्या ४० वर 

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -