घरमहाराष्ट्रआमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांचा कारावास, जिल्हा न्यायालयाचा निर्णय

आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांचा कारावास, जिल्हा न्यायालयाचा निर्णय

Subscribe

जिल्हा परिषदेच्या सभेदरम्यान गट विकास अधिकाऱ्याच्या दिशेने माईक आणि पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या प्रकरणी आमदार देवेंद्र भुयार यांना शिक्षा झाली आहे. त्यांना जिल्हा न्यायालयाने तीन महिने साधा कारावास आणि 15 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. देवेंद्र भुयार हे जिल्हा परिषदेचे सदस्य असतानाची ही घटना आहे.

यामुळे दाखल झाला गुन्हा – 

- Advertisement -

पाणीटंचाईच्या प्रश्नावर २८ मे २०१९ रोजी जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत वरूड तालुक्यातील पाणीटंचाई विषयी गटविकास अधिकारी सुभाष बोपटे माहिती देत होते. यावेळी एका मुद्यावरून भुयार आणि बोपटे यांच्यात चकमक उडाली. यावर संतप्त होत भुयार यांनी बोपटे यांच्या दिशेने माईक आणि पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या होत्या.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची तक्रार –

- Advertisement -

या प्रकारानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या तक्रारीच्या आधारे देवेंद्र भुयारांच्या विरोधात गाडगेनगर पोलीस ठाण्यात कलम ३५३, १८६ व ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. रणजीत भेटाळू यांनी एकूण सात साक्षीदार तपासले. एकही साक्षीदार फितूर झाला नाही.‍ फिर्यादी आणि गटविकास अधिकारी सुभाष बोपटे यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.

जिल्हा न्यायालयाने सुनावली शिक्षा –

गुन्हा सिद्ध झाल्यानंतर देवेंद्र भुयार यांना न्यायाधीश एस.एस अडकर यांनी तीन महिन्याचा साधा कारावास आणि 15 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास त्यांना एक महिना अतिरिक्त कारवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील रणजीत भेटाळू यांनी युक्तिवाद केला. दरम्यान २०१३ मध्ये वरूडच्या त्यावेळच्या तहसीलदारांना शिवीगाळ, मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने देवेंद्र भुयार यांना गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये तीन महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -