घरताज्या घडामोडीसोलापूरच्या 'या' जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्याचे विधान परिषदेत निलंबन

सोलापूरच्या ‘या’ जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्याचे विधान परिषदेत निलंबन

Subscribe

सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात घोषणा केली.

सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात घोषणा केली. डॉ. शितलकुमार जाधव यांना तडकाफडकी निलंबित केल्यानंतर विरोधकांनी आरोग्यमंत्र्यांचे आभार मानले. (District Health Officer Of Solapur Dr Sheetal Kumar Jadhav Suspended By Health Minister Tanaji Sawant)

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशाचा आज सहावा दिवस आहे. आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सोलापूर जिल्ह्यातील 22 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 68 उपकेंद्र यांच्या नवीन प्रस्तावाबाबत सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. रणजितसिंह मोहिते-पाटलांच्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री सावंत यांनी डॉ. शितलकुमार जाधव यांना निलंबनाची घोषणा केली.

- Advertisement -

दरम्यान, शासन स्तरावरील प्रशासनाकडून वारंवार पत्र देऊन प्रस्ताव मागवून देखील प्रस्ताव सादर न केल्यामुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. तसेच, राज्यातील नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे. गरजा वाढत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रासाठी पदभरती, मशीनरी, अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल. शिवाय या मोहिमांच्या कामासाठी सर्वकष कृती आराखडा तयार करणार असल्याचे म्हणाले.

डॉ शितलकुमार जाधव हे सोलापूर येथे सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कृष्ठरोग) येथे कार्यरत होते. मात्र कोरोनाच्या काळात त्यांच्याकडे सोलापूर शहर आरोग्य अधिकारीपदाची सुत्रे देण्यात आली होती.

- Advertisement -

दरम्यान, आरोग्य विभागातील रिक्तपदे भरण्यासाठी येत्या पंधरा दिवसांत जाहिरात निघेल व त्यानुसार भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशीही माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सोमवारी विधानपरिषदेत दिली. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे व उप केंद्रे येथील रिक्त पदांचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आला होता. त्याचे उत्तर देताना मंत्री सावंत यांनी ही माहिती दिली.


हेही वाचा – आरोग्य विभागातील भरतीची जाहिरात १५ दिवसांत निघणार : तानाजी सावंत

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -