दिवा- रोहा गाडीचा ब्रेक निकामी; प्रवासी स्थानकात खोळंबळे

diva roha train break failed
दिवा- रोहा गाडीचा ब्रेक निकामी; प्रवासी स्थानकात खोळंबळे

दिवा-रोहा ट्रेन ही सकाळची 8.45 वाजण्याच्या सुमारास दिवा स्थानकातून सुटणाऱ्या गाडीचा ब्रेक निकामी झाल्याने रद्द करण्यात येत आहे. यामुळे सकाळी 8.15 पासून प्रवासी दिवा स्थानकात खोळंबले आहेत. ब्रेक तुटला होता तर गाडी चेक करून पाठवत नाहीत का किंवा दिवा स्थानकात गाडी १ तास अगोदर येते, मग त्या दरम्यान गाडी चेक का केली जात नाही? असा सवाल प्रवाश्यांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान दोन – अडीच तास बसलेल्या प्रवाशांना पर्यायी व्यवस्था म्हणून कळवा कारशेड मधून पर्यायी गाडी येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. ही गाडी अजूनही आलेली नाही सदर पर्यायी गाडी कल्याण स्थानकात जाऊन पुन्हा दिव्याला येणार असल्याचे बोलले जाते. अशी माहिती दिवा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत यांनी दिली.

दिवा रोहा गाडीत झालेल्या बिघाडामुळे खोळंबलेल्या प्रवाशांनी आपल्या तिकिटाचे पैसे परत मागण्यासाठी गेले असता त्यांना नकार देण्यात आला. त्यानंतर रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांच्या कार्यालयाशी बोलणं केल्या नंतर व स्थानिक स्टेशन मास्तर यांना जाब विचारल्या नंतर तिकिटाचे पैसे परत देण्यास सुरुवात केली आहे.


Weather Update : उत्तर, पश्चिम, मध्य भारतात उष्णतेची लाट कायम, 16-17 मेपर्यंत पावसाचा अंदाज