घर महाराष्ट्र "ओबीसी 'ए' आणि ओबीसी 'बी' विभागणी करून मराठा आरक्षण द्यावे", वडेट्टीवारांचा सरकारला...

“ओबीसी ‘ए’ आणि ओबीसी ‘बी’ विभागणी करून मराठा आरक्षण द्यावे”, वडेट्टीवारांचा सरकारला सल्ला

Subscribe

मुंबई : ओबीसी ‘ए’ आणि ओबीसी ‘बी’ अशी विभागाणी करून मराठ्यांना आरक्षण द्यावे, असा सल्ला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी केली होती. यानंतर आता विजय वडेट्टीवारांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासंदर्भात नवीन मागणी केले आहेत.

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात विजय वडेट्टीवार म्हणाले, “नवीन कॅटेगरी कराता येईल. आम्ही ओबीसीमध्ये आहोत, आमचा वाटा सोडून मराठा समाजाला आरक्षण असेल, तर आम्हाला ओबीसी ए आणि मराठा समाजाची भावनिक इच्छा असेल, तर त्यांना ओबीसी बी करा. याचा अर्थ त्यांचा आरक्षणांचा कोटा वाढवून त्यांना वेगळे द्या. यासाठी आमच्या ओबीसीमधून आरक्षण देण्याची गरज नाही. केंद्र आणि राज्य सरकारचा तिडा आहे की, ओबीसींची मते पाहिजेत. पण ओबीसींसाठी काही करायचे नाही.”

- Advertisement -

हेही वाचा – जालन्याचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार, तरी जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; म्हणाले…

मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगेंची मागणी

राज्य सरकारने जीआर काढूनही जालन्यातील मनोज जरांगे हे उपोषण मागे घेण्यास तयार नाही. कारण, सरकारच्या जीआरमध्ये मराठा समाजाने वंशावळीचे दस्ताऐवज दाखवून ओबीसीचे जात प्रमाणपत्र घ्यावे, असे लिहिले आहे. यावर मराठा समाजाकडे वंशावळ नसल्याने राज्य सरकारने वंशावळीचे दस्ताऐवज उल्लेख काढून सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मनोज यांनी केली आहे. जोपर्यंत राज्य सरकार त्यांच्या जीआरमध्ये बदल करणार नाही. तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – “ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवा…”, विजय वडेट्टीवारांची मागणी

ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवा आणि…

ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवा आणि मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, असे वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केले होते. विजय वडेट्टीवार म्हणाले, “मराठा आरक्षणावर लवकर तोडगा निघाला पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा करत आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता अधिकचे वाढवून द्या. वाढवून मराठा समजाला जेवढे आरक्षण द्याचे ते द्या. ही जबाबदारी शासनाची आहे. केंद्र आणि राज्यात बहुमताचे सरकार आहे. झटक्यामध्ये काम होऊ शकते. फिरवा फिरवी कशाला. कशाला एका महिन्याची मुदत पाहिजे. कुणबी आरक्षण देत असताना आधी आरक्षण वाढवा. आरक्षणात वाढ करा आणि मग ओबीसीसंदर्भात विचार करा, असे मी जालन्यात मंचावर जाऊन बोललो. मी ओबीसी नेता म्हणून जी भूमिका ओबीसी समाजाची आहे. तीच भूमिका माझी राहणार आहे. मी स्पष्टपणे सांगतो की, ओबीसीच्या आरक्षणात वाढ करा आणि मग हा विचार करा.”

- Advertisment -