घरताज्या घडामोडीDiwali Guidelines 2021: दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी, राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना...

Diwali Guidelines 2021: दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी, राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

Subscribe

दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करण्याचे आवाहन

राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरल्याने सर्वच गोष्टी खुल्या करण्यात आल्या आहेत. मात्र आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होण्याची शक्यता गृहित धरून राज्य सरकारने दीपावलीचा उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमांना परवानगी देतानाच असे सर्व कार्यक्रम शक्यतो ऑनलाईन, केबल नेटवर्क किंवा फेसबुक लाईव्ह अशा माध्यमातून करण्यात यावेत,असेही म्हटले आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणावर निर्बंध शिथिल करण्यात आले असून सिनेमागृह आणि नाट्यगृहांसोबतच दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमांना देखील परवानगी देण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती आणि गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारने दिवाळी सणासाठी नियमावली जाहीर केली आहे.

- Advertisement -

त्यानुसार राज्यातली धार्मिक स्थळे पुन्हा खुली करण्यात आली आहेत. मात्र, तरीदेखील दिपावलीचा उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील, याची दक्षता घेतली जावी, दिपावलीच्या काळात खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असल्याने नागरिकांनी गर्दी टाळावी. विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी बाहेर पडणे टाळावे असे म्हटले आहे.

दिपावलीच्या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी होत असल्याने वायू, ध्वनीप्रदूषणाची पातळी वाढून लोकांच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. करोना लागण झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होण्याची भिती आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडण्याचे टाळून दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा, असे म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Firecracker Ban: सार्वजनिक स्थळी मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी, पुणे पोलिसांची नवी नियमावली

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -