Maharashtra Assembly Election 2024
घरठाणेठाण्यामध्ये आज उजाडलेली दिवाळी पहाट... सुषमा अंधारे यांच्या निशाण्यावर मुख्यमंत्री शिंदे

ठाण्यामध्ये आज उजाडलेली दिवाळी पहाट… सुषमा अंधारे यांच्या निशाण्यावर मुख्यमंत्री शिंदे

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात आज, रविवारी दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबई आणि परिसरात ‘दिवाळी पहाट’चे आयोजन केले जाते. मात्र, ठाण्यात शिंदे गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाटेच्या निमित्ताने ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शरसंधान केले आहे.

हेही वाचा – शरद पवारांनी घेतलं ओबीसी प्रमाणपत्र? कथित जातीचा दाखला सोशल मीडियावर व्हायरल, काय आहे प्रकरण…

- Advertisement -

दिवाळीनिमित्त अनेक ठिकाणी दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आगामी निवडणूक आणि मतांचे गणित डोळ्यासमोर प्रत्येक सामाजिक, सांस्कृतिक सण आणि उत्सवांचे राजकीय संधीत रूपांतर करण्यात आघाडीवर असलेल्या भाजपाने यंदा दिव्यांचा सण अर्थात दीपवालीनिमित्त मुंबईत ठिकठिकाणी दिवाळी पहाट, दिवाळी संध्येच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात मात्र दिवाळी पहाटनिमित्त शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. गौतमीच्या कार्यक्रमात तरुणाईने मनोसक्त जल्लोष करत थिरकली.

हेही वाचा – मुंब्र्यात काही फुसके बार येऊन गेले, पण…; शिंदेंची ठाकरेंवर खोचक टीका

- Advertisement -

‘सब से कातिल’ गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. तिच्या कार्यक्रमावरून अनेकदा वाद देखील निर्माण होत असतात. ठाण्यातील तलाव पाळी भागात ‘दिवाळी पहाट’ गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. गौतमी पाटीलने देखील इन्स्टाग्रामवर ही माहिती शेअर केली होती. त्यासंबंधीच्या स्टोरीतील पोस्टरमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचाही फोटो होता. पण आता त्याचवरून सुषमा अंधारे यांच्या निशाण्यावर मुख्यमंत्री शिंदे आले आहेत. दिवाळी पहाटनिमित्त आम्ही पं. बिस्मिल्ला खान यांची सनई, पं. भीमसेन जोशी यांचे भक्तीगीत किंवा पद्मजा फेणाणी यांचा गोड गळा… हे सगळे ऐकून होतो. पण ठाण्यामध्ये आज उजाडलेली दिवाळी पहाट ही शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनाच काय, अवघ्या महाराष्ट्राला सुद्धा अपेक्षित नसेल, असा टोला त्यांनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -