कोकणातील ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष, म्हणाले, “हा तर एक प्रकारचा बदला…”

गेल्या सहा वर्षापासून शिक्षकांचे प्रश्न आणि कामे मार्गी लावली नव्हती. त्यामुळे पेन्शनचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करणार, असं आश्वासन देखील ज्ञानेश्वर म्हात्रेंनी दिलं.

BJP-Dnyaneshwar-Mhatre,-Win-Workers-Celebrations
गेल्या सहा वर्षापासून शिक्षकांचे जे जे प्रश्न प्रलंबित होते ते सोडवण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करत राहणार, अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वर म्हात्रेंनी दिली.

कोकण विभाग विधान परिषद शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत यंदा राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अत्यंत चुरशीची लढत पहावयास मिळाली. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले. महाविकास आघाडीचा पाठिंबा असूनही उमेदवार बाळाराम पाटील यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे.

कोकणातील भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या विजयानंतर भाजपने दणक्यात सेलिब्रेशन केलं. भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय घोषित झाल्यानंतर सर्व भाजप पदाधिकारी एकत्र जमून हा जल्लोष साजरा केला. भाजपने ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळत आणि फटाके फोडून कोकणातील विजयाचा आनंद साजरा केला. विजेते ज्ञानेश्वर म्हात्रे यांना खांद्यावर उचलून घेवून विजयाच्या घोषणा दिल्या जात होत्या.

Dnyaneshwar-Mhatre-BJP-Win
भाजपने ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळत आणि फटाके फोडून कोकणातील विजयाचा आनंद साजरा केला.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, पनवलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजेते ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. तसंच एकमेकांना पेढे भरवत हा आनंद साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि उत्साह हा पाहण्यासारखा होता. यांच्या समवेत शिक्षक समितीच्या सदस्य आणि म्हात्रे यांच्या पत्नी स्नेहल म्हात्रे, बदलापूरचे माजी नगराध्यक्ष आणि म्हात्रे यांचे बंधू वामन म्हात्रे, माझे स्थायी समिती सभापती तुकाराम म्हात्रे आणि शेकडो कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शिक्षक समितीच्या सदस्य आणि म्हात्रे यांच्या पत्नी स्नेहल म्हात्रे, बदलापूरचे माजी नगराध्यक्ष आणि म्हात्रे यांचे बंधू वामन म्हात्रे, माझे स्थायी समिती सभापती तुकाराम म्हात्रे आणि शेकडो कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर आनंदोत्सव साजरा केला.

Ravindra-Chavhan-Dnyaneshwar-Mhatre-Win
कोकणातील भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या विजयानंतर भाजपने दणक्यात सेलिब्रेशन केलं.
Dnyaneshwar-Mhatre-Win-Prashant-Thakur
पनवलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजेते ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली.

ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी ९६८६ अधिक मते मिळवत महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांना पराभूत केले. २०१७ मध्ये शेकापचे बाळाराम पाटील यांच्या विरोधात शिवसेनेतून उभे असणाऱ्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा ४ हजार ९५० मतांनी पराभव झाला होता. यंदा मात्र भाजपाच्या माध्यमातून दुप्पट मतांनी विजयश्री खेचून आणण्यात म्हात्रे यांनी यश मिळवले आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण आठ उमेदवार रिंगणात होते. मुख्य लढत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे आणि शेकापचे बाळाराम पाटील यांच्यात पहावयास मिळाली. आज झालेल्या मत मोजणीत भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २०,६८३ मते मिळाली. तर बाळाराम पाटील यांना १०,९९७, धनाजी पाटील १४९०, उस्मान रोहेकर ७५, तुषार भालेराव ९०, रमेश देवरुखकर ३६, राजेश सोनावणे ६३, संतोष डामसे १६ इतकी मते मिळाली. तर नोटा आणि बादची १६१९ मते पडली आहेत. एकूण ३५ हजार ०६९ मते पडली.

कोकणातील विजयानंतर भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्यावर तीव्र शब्दात टिका केलीय. मागील सहा वर्षांमध्ये निवडून दिलेल्या उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारची शिक्षकांचे प्रश्न आणि कामे मार्गी लावली नव्हती. त्यामुळे नाराज असलेल्या शिक्षकांनी शिक्षक म्हणून आपल्या हक्काचा उमेदवार निवडून दिला आहे. मागच्या सहा वर्षात शिक्षक नसलेल्या माणसाने आम्हाला मागे टाकलं होतं. त्यामुळे शिक्षकांनी घेतलेला हा एकप्रकारचा बदला आहे.

Dnyaneshwar-Mhatre
हा विजय माझा एकट्याचा नसून माझ्या संपूर्ण शिक्षकाचा आहे, अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वर म्हात्रेंनी दिली.
हा विजय शिक्षकांचा आहे

यापुढे बोलताना ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले की, हा विजय माझा एकट्याचा नसून माझ्या संपूर्ण शिक्षकाचा आहे. गेल्या सहा वर्षापासून मी केलेल्या कामांची ही पोच पावती मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर आणि उदय सामंत यांच्यामुळेच मला हे यश मिळालं. या सर्वांमुळेच घवघवीत मतांनी विजय झाला आहे. २३ आमदार, ४ खासदार आणि दोन केंद्रीय मंत्री या सर्वांनी जो विश्वास टाकला तो सार्थ झाला. हा शिक्षकांचा विजय आहे.

शिक्षकांविषयी असणाऱ्या इतर मागण्यांसाठी पाठपुरावा करणार

गेल्या सहा वर्षापासून शिक्षकांचे जे जे प्रश्न प्रलंबित होते ते सोडवण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करत राहणार. यापूर्वी मी आझाद मैदानात आंदोलने केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्याकडे रात्रीबेरात्री जाऊन हा प्रश्न सोडवला. पुढेही असेच कार्य सुरू ठेवणार असं देखील ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले. मला शिक्षकांच्या पेन्शनचाही प्रश्न सोडवायचा आहे, असंही त्यांनी सांगितलं.