घरमहाराष्ट्रविनाकारण शिवसेनेला बदनाम करू नका, नीलम गोऱ्हेंचा पलटवार

विनाकारण शिवसेनेला बदनाम करू नका, नीलम गोऱ्हेंचा पलटवार

Subscribe

उदय सामंतांच्या हल्ल्याबाबत विनाकारण शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये, असं शिवसेनेच्या नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या गटात सहभाग घेतला. तेव्हापासून राज्यात शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात वाद सुरू आहे. अशातच मंगळावारी रात्री उदय सामंत यांच्या गाडीचा ताफा कात्रज चौकात पोहोचला. तानाजी सावंत यांच्या घराच्या दिशेने उदय सामंत जात असताना त्यांच्या गाडीवर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी हल्ला केला. यामध्ये सामंतांच्या गाडीची मागची काच फुटली. हा हल्ला शिवसैनिकांनी केला असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे उदय सामंतांच्या हल्ल्याबाबत विनाकारण शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये, असं शिवसेनेच्या नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा – माझ्या गाडीवरील हल्ला पूर्वनियोजित; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

- Advertisement -

“पुण्यात आज शिवसेनेची कात्रज याठिकाणी सभा झाली. त्या सभेनंतर परतत असताना काही व्यक्तींनी माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीची काच फोडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा दिसून येत आहे. बऱ्याच वाहिन्यांवर चित्रीकरण गेलेलं आहे. या सगळ्या घटनेमध्ये पूर्णपणे मी स्पष्ट करू इच्छिते की, हे जे लोक आहेत ते कोण आहेत नक्की ते जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत ते गृहीत धरणे की हे शिवसैनिकच आहेत किंवा कसं आणि तो हल्ला काही पूर्वनियोजित आहे की काय वगैरे अशा पद्धतीचे आरोप केले जातात ते योग्य नाही. आमच्या सभेमध्ये आदित्य साहेबांनी जे भाषण केलं, आमची जी भाषणे झाली ते संपूर्णपणे लोकशाही चौकटीतलेच विचार मांडलेले होते. उलट ज्यांना शिवसेनाची भूमिका पटत नाही त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावं असं म्हटलं होतं. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं गाडी फोडण्याच्या घटनेशी या भाषणांचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे विनाकारण शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. पोलिसांच्या तपासात जे काही समोरी येईल त्याच्यावर योग्य ती कारवाई पोलिसांनी करावी, असंही निलम गोऱ्हे म्हणाल्या.

हेही वाचा – आमच्या सहनशिलतेचा अंत कुणी पाहू नका, उदय सामंतांचा हल्लेखोरांना इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -