घरCORONA UPDATE'गावागावातली म्हणते पारू, लॉकडाऊनमुळे नवऱ्याची सुटली दारू' - रामदास आठवले

‘गावागावातली म्हणते पारू, लॉकडाऊनमुळे नवऱ्याची सुटली दारू’ – रामदास आठवले

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील महसूलासाठी वाईन शॉप सुरू करावे, असे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिल्यानंतर आता केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्या या मागणीचा विरोध केला आहे. कोरोनाला नष्ट करण्यासाठी लॉकडाऊन पाळणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकाने बंद असल्याने अनेकांचे दारूचे व्यसन सुटले आहे. त्यामुळे “गावागावातील म्हणते पारू लॉकडाऊनमुळे माझ्या नवऱ्याची सुटली आहे दारू” त्यामुळे जर थोड्या महसुलासाठी लॉकडाऊनच्या काळात पुन्हा दारू ची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला तर कोट्यवधी लोकांच्या आनंदावर विरजण टाकणारा पडणार, असे आठवले यावेळी म्हणालेत. दरम्यान यासाठी रामदास आठवले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार आहेत.

लॉकडाऊनमध्ये दारू कुठेही मिळत नाही, त्यामुळे अनेकांचे दारूचे व्यसन सुटले आहे. त्यामुळे ज्यांचे दारूचे व्यसन सुटले त्यांच्या कुटुंबात आनंद आहे. आता पुन्हा लॉकडाऊनमध्ये जर दारूची दुकाने सुरू करण्याचा विचार राज्य सरकारने केला तर तो चुकीचा निर्णय ठरेल, असे रामदास आठवले यांनी संगितले.

- Advertisement -

“दरम्यान कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह देशात सध्या लॉकडाऊन आहे. याचमुळे राज्यातील उद्योगधंदे बंद असल्यामुळे त्याचा मोठा आर्थिक फटका राज्य सरकारच्या तिजोरीला बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत राज्याला महसूल मिळवून देणारे वाईन शॉप्स सुरू करून राज्याला महसुलाचा ओघ सुरू होईल, हे बघायला काय हरकत आहे?”, असे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला लिहिले होते. या पत्रामध्ये त्यांनी वाईन शॉप्ससोबतच हॉटेल, खानावळी देखील सुरू करण्याची मागणी केली आहे. राज्याच्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा निर्णय घ्यावाच लागेल, असे त्यांनी नमूद केले होते.

पार खडखडाट झालेल्या राज्याच्या तिजोरीत आता महसुलाची काही प्रमाणात आवक सुरू व्हावीच लागेल. १८ मार्चपासून टाळेबंदी आहे. पुढे किती दिवस ही परिस्थिती राहील याची खात्री नाही. अशा काळात किमान वाईन शॉप्स सुरू करून राज्याला महसुलाचा ओघ सुरू होईल हे बघायला काय हरकत आहे? असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -