घरताज्या घडामोडीआम्ही किंवा राहुल गांधींनी काय बोलावे हे तुम्ही सांगू शकत नाही; काँग्रेसने...

आम्ही किंवा राहुल गांधींनी काय बोलावे हे तुम्ही सांगू शकत नाही; काँग्रेसने उद्धव ठाकरेंना सुनावले

Subscribe

काँग्रेस पक्षाची भूमिका राहुल गांधी यांनी स्पष्ट केली आहे. आम्ही आमची भूमिका सोडणार नाही. आमचे विचार स्पष्ट आहेत. आम्ही काय बोलावं, राहुल गांधींनी काय बोलावं याबाबत उद्धव ठाकरे आम्हाला सांगू शकत नाही, अशा शब्दांत काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे.

काँग्रेस पक्षाची भूमिका राहुल गांधी यांनी स्पष्ट केली आहे. आम्ही आमची भूमिका सोडणार नाही. आमचे विचार स्पष्ट आहेत. आम्ही काय बोलावं, राहुल गांधींनी काय बोलावं याबाबत उद्धव ठाकरे आम्हाला सांगू शकत नाही, अशा शब्दांत काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे. (Do not tell Rahul Gandhi what to say Congress told Uddhav Thackeray)

कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर राज्यभरात राजकीय वातावरण चिघळले असून, विरोधकांडून राहुल गांधींवर टीका केली जात आहे. अशातच “स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा काढण्याचं काहीच कारण नव्हतं. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असं नाही. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. राहुल गांधी यांनी अशा प्रकारचं विधान करण्याची काहीच गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते हे लक्षात घ्या”, असं उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. राऊतांच्या या वक्तव्यानंतर कॉंग्रेसने ठाकरे गटाला सुनावले.

- Advertisement -

“आम्ही सरकारमध्ये एकत्र आलो तेव्हा आम्ही आमची भूमिका सोडावी, त्यांनी त्यांची भूमिका सोडावी असं कुठल्याही पक्षाने अट ठेवली नव्हती. काँग्रेस पक्षाची भूमिका राहुल गांधी यांनी स्पष्ट केली आहे. आम्ही आमची भूमिका सोडणार नाही. आमचे विचार स्पष्ट आहेत. आम्ही काय बोलावं, राहुल गांधींनी काय बोलावं याबाबत उद्धव ठाकरे आम्हाला सांगू शकत नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे”, माणिकराव ठाकरे यांनी म्हटले.

“आम्ही त्यांना विचार सोडून आमच्यासोबत या म्हटलं नव्हतं. आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र येत किमान समान कार्यक्रम आखला. जो जनहिताच्या आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. स्वातंत्र्यातील आमची भूमिका स्पष्ट होती. राहुल गांधींनी त्यांचा लेखी पुरावा दिला. भारत आणि पाकिस्तान फाळणीचा विचार सावरकर विचारसरणीच्या लोकांनी केला. हिंदू, मुस्लीम एकत्र राहू शकत नाही अशाप्रकारे विधाने, त्यांची भूमिका उघड आहे. काहींना माहिती आहे काहींना माहिती नाही. परंतु आता ते समोर येतंय. ठाकरेंमध्ये आणि आमच्यात वाद झाला नाही. त्यांची भूमिका ते मांडतायेत, आमची भूमिका आम्ही मांडतोय. त्यामुळे वाद झाला, आता सोबत येणार नाही वैगेरे या चर्चेला अर्थ नाही”, असेही माणिकराव ठाकरे यांनी म्हटले.

- Advertisement -

“राहुल गांधी तिरस्कार कुणाचा करणार नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका त्यांची आहे. धार्मिक द्वेषामुळे तिरस्कार होतो. ना मुस्लीम, ना हिंदु. ना बौद्ध असा विचार न करता राष्ट्राच्या हितासाठी सर्वांना जोडून पुढे जायला हवं. एका धर्माला अधिक प्राधान्य न देता सगळ्यांना सोबत घ्यायला हवं. देश एकसंघ ठेवायचा असेल तर भारत जोडो यात्रा यातून ते स्पष्ट होतंय”, असेही त्यांनी म्हटले.

याशिवाय, “काँग्रेसला भाजपा जोडो विचार करायचा आहे तर विरोधकांना भारत तोडो असे करायचे आहे. धार्मिक तेढ निर्माण केले तर देशात सौख्य कसे राहील? हीच भूमिका राहुल गांधी यांच्या भारत जोडोची आहे. बेरोजगारी, महागाई, शेतकरी प्रश्न देशाच्या हिताचे आहे. संसदेत चर्चा होत नाही. त्यामुळे हे प्रश्न भारत जोडोच्या माध्यमातून मांडले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.


हेही वाचा – मराठी भाषेतून शिक्षण देण्यावर राज्य शासन भर देणार, दीपक केसरकरांचं आवाहन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -