घरCORONA UPDATECoronavirus : सोशल डिस्टन्सिंग शब्द वापरू नका, राष्ट्र सेवा दलाचे पंतप्रधानांना पत्र

Coronavirus : सोशल डिस्टन्सिंग शब्द वापरू नका, राष्ट्र सेवा दलाचे पंतप्रधानांना पत्र

Subscribe

सोशल डिस्टसिंग हा शब्द जगात नव्याने कॉईन झाला असला तरी भारतात या शब्दाचा वास दोन हजार वर्षांपासून आहे. त्याऐवजी फिजिकल डिस्टन्सिंग हा शब्द वापरण्याची गरज आहे.

सोशल डिस्टसिंग हा शब्द जगात नव्याने कॉईन झाला असला तरी भारतात या शब्दाचा वास दोन हजार वर्षांपासून आहे. त्याऐवजी फिजिकल डिस्टन्सिंग हा शब्द वापरण्याची गरज आहे, अशा आशयाचे पत्र राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी आणि महाराष्ट्र विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.
जातीप्रथेच्या नावाखाली अस्पृश्यता म्हणजे विशिष्ट समाजापासून सामाजिक अंतर राखणंच होते. देशाला आणि माणुसकीला लज्जास्पद असलेला हा दोन हजार वर्षांचा काळाकुट्ट इतिहास आहे. या अस्पृश्यतेच्या विरोधात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मोठा लढा दिला. स्वातंत्र्याच्या चळवळीचा त्यांनी तो महत्त्वाचा भाग मानला. भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर जातीव्यवस्थेला सुरुंग लावला. संविधानाने अस्पृश्यता संपुष्टात आणली आणि समाजात वास करून असलेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या कुप्रथेला कायमची मूठमाती दिली. हा शब्द प्रयोग म्हणून नाकारण्याची आवश्यकता होती.

फिजिकल डिस्टन्सिंग हा अधिक योग्य शब्द

सोशल डिस्टन्सिंगची नाही तर सोशल कनेक्शनची उलट सर्वाधिक गरज लॉकडाऊन सारख्या काळात असते. फिजिकल डिस्टन्सिंग हा अधिक योग्य शब्द होता. जगभरच्या अनेक समाज शास्त्रज्ञ यांनी याबद्दल आक्षेप घेतल्यानंतर आता जागतिक आरोग्य संघटननेने सोशल डिस्टन्सिंग हा शब्द वापरणे २० मार्चलाच सोडून दिले आहे. एव्हाना डब्ल्यूएचओने कनेक्टेडनेस विथ फिजिकल डिस्टन्स असा नवा शब्द प्रयोग सुरू केला आहे.

- Advertisement -

बातम्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग हा शब्द वापरला जात आहे

भारतात २४ मार्चला लॉकडाऊन जाहीर करताना आपण तो शब्द वापरलेला आहे. १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आपण देशाला संबोधित केलं त्यादिवशी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाकारलेल्या या शब्दाचा प्रयोग पुन्हा झाला. अजूनही शासकीय प्रचारात, जाहिरातींमध्ये, सोशल मीडियात आणि इलेक्ट्रॉनिक / प्रिंट मीडियाच्या बातम्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग हा शब्दच वापरला जात आहे. हा शब्दप्रयोग तातडीने थांबवण्याची आवश्यकता आहे. यापुढे तरी तो टाळावा आणि यासाठी देशाचे प्रमुख या नात्याने आपणच पुढाकार घ्यावा अशी विनंती आहे.

मीडियाने हा शब्द प्रयोग थांबवला पाहिजे

फिजिकल डिस्टन्सिंग म्हणजे संशयित रुग्ण आणि इतर यांच्यामध्ये संक्रमण होणार नाही इतके अंतर ठेवणे. यासाठी हवं तर कोरोना डिस्टन्सिंग असा थेट शब्द प्रयोग करणं अधिक युक्त ठरेल. जाती प्रथेची सगळी उतरंड, उच्च निचतेची प्रथा सोशल डिस्टन्सिंगच्या सूत्रावर बांधली गेली आहे. म्हणून मीडियाने हा शब्द प्रयोग थांबवला पाहिजे, असंही आवाहन आम्ही करत आहोत, असेही पत्रात नमुद करण्यात आले आहे. कोरोनाच्या प्रसाराला कोणत्याच जाती, धर्माचं, प्रांतांचं, भाषेचं आणि देशाचं बंधन राहिलेलं नाही. या साऱ्या सीमा ओलांडून आज जग कोरोनाच्या विळख्यात गेलं आहे. त्यामुळे त्याला धर्म चिकटवणं हे निव्वळ अशास्त्रीयच आहे. तरीही राळ उठवण्यात आली. त्यामागे काही अजेंडा आहे? याची भीती या देशावर आणि देशवासियांवर प्रेम करणाऱ्यांना वाटत आहे. ज्या पद्धतीने या बातम्यांचा प्रसार केला गेला आणि त्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून जो विखारी प्रचार करण्यात आला तो थांबवण्यासाठी या देशाचे संविधानिक प्रमुख या नात्याने आपण पुढाकार घेणं आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -