घरमहाराष्ट्रआराखड्यातील कामे आंतरराष्ट्रीय दर्जाची करा- सुधीर मुनगंटीवार

आराखड्यातील कामे आंतरराष्ट्रीय दर्जाची करा- सुधीर मुनगंटीवार

Subscribe

आराखड्यातील कामे आंतरराष्ट्रीय दर्जाची होतील याची काळजी घेतली जावी असे निर्देश अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

महात्मा गांधीजी च्या वास्तव्याने पुनीत झालेल्या वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रम आणि परिसराचा विकास करण्यासाठी शासनाने २६६ कोटी रु चा सेवाग्राम विकास आराखडा मंजूर केला आहे. या आराखड्यातील कामे आंतरराष्ट्रीय दर्जाची होतील याची काळजी घेतली जावी असे निर्देश अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आज त्यांनी या आराखड्यातील विविध कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
महात्मा गांधीजींच्या जीवनपटावर आधारित विविध घटना प्रसंग आराखड्यातील कामात साकारले जात आहेत. हे काम करताना या ऐतिहासिक घटनांची माहिती त्या खाली देण्यात यावी.  सेवाग्राम आश्रमातही “चले जाओ” आंदोलन झाले होते  गांधीजी च्या १५० व्या जयंती निमित्ताने येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले जावे.  स्वच्छता हा गांधीजींच्या जीवन शैलीचा आधार होता हे लक्षात घेऊन वर्ध्यात “सॅनिटेशन पार्क” उभारले जावे. यासंदर्भात जगात कोणत्या नाविन्यपूर्ण कल्पना राबविल्या गेल्या हे अभ्यासले जावे असे ही ते म्हणाले.

आराखड्यातील कामाना गती द्या

वर्ध्यात थीम बेस वृक्ष लागवड केली जावी. स्वच्छतेमध्ये वर्धा जिल्हा मॉडेल सिटी करण्यासाठी एक मॉडेल  विकसित केले जावे. विविध प्रकारच्या कचऱ्याच्या विघटनातून खत निर्मितीचा या मॉडेल प्रकल्पात विचार केला जावा.  येथे उभारण्यात आलेला चरखा  आणि सेंट्रेलाईज वातानुकुलीत यंत्रणा सोलरवर आणली जावी, आराखड्यातील सर्व कामे वेगाने पूर्ण केली जावीत असे निर्देश ही मुनगंटीवार यांनी दिले.

- Advertisement -

गांधी विचारांवर काम करणाऱ्या संस्थांचे संमेलन घ्या

सर्व विभागाच्या सचिवांना एक पत्र देऊन ४ दिवसात या आराखड्यात राबवावयाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती त्यांच्याकडून घ्यावी व त्यांचा विस्तारित आराखड्यात समावेश केला जावा. रोजगार, कौशल्य विकासाची सांगड घालून काही कार्यक्रम आखता येतील का हे देखील पाहिले जावे.  आराखड्याची कामे करताना लोकप्रतिनिधी ना विश्वासात घेतले  जावे. विकास नियोजनात लोकांचा सहभाग वाढवला जावा, अशा सूचना ही मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.   सेवाग्राम विकास आराखड्यात केलेली कामे विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना या कामांची माहिती  दिली जावी.  ज्या संस्थांची प्रेरणा महात्मा गांधी जी चे विचार आहे, अशा देशभरातील संस्थांची यादी तयार करून त्यांचे  वर्ध्यात एक संमेलन आयोजित केले जावे. महात्मा गांधीजी च्या १५० व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्रात होत असलेल्या सर्व कामांची माहिती त्यांना दिली जावी, असे ही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -