घर महाराष्ट्र नागपूर नागपुरातील मारबत उत्सवामधील 'या' रंजक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

नागपुरातील मारबत उत्सवामधील ‘या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Subscribe

नागपूर : विदर्भातील मारबत उत्सवाची राज्यभरात चर्चा असते. या उत्सव पाहण्यासाठी राज्यभरातून विदर्भात मोठ्या संख्येने लोक गर्दी करतात. या उत्सवातून विदर्भाच्या ऐतिहासिक आणि सांसकृतिक वैभव म्हणून ओळखले जाते. विदर्भातील मारबत उत्सवाला 143 वर्षाची जुनी परंपरा आहे. हा उत्सव 1881 मध्ये मस्कासाथ भागातून काळी मारबतची मिरवणूक काढली जाते. तसेच 1885 जागनाथ बुधवारी भागामधून तेली समाजाची दर वर्षा पिवळी मारबतची मिरवणूक काढली जाते. ही परंपरा आज ही कामय असून या दोन्ही मिरवणुका स्वतंत्ररित्या निघाल्या. ही मिरवणूक नेहरू चौक परिसरातून एकत्रित येतात. यावेळी हजारो नागपूकर दोन्ही मारबतलला नमन केले आणि एकत्रित मिरवणुकीला सुरुवता झाली.

नागपूरात आज मारबत मिरवणुकीत उदयनिधी स्टॅनिल यांच्या प्रतिकात्मक बडग्याचने सर्वांचे लक्ष वेधले. नुकतेच उदयनिधी स्टॅलिनने सनातन धर्माविषयी केलेले वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे नागपूरच्या मारबत उत्सवात उदयनिधी स्टॅलिनच्या बडगा शहरात फिरवण्यात आला. याव्यतिरिक्त महागाई आणि भ्रष्टाचार काढण्यात आले.

मारबत उत्सवाचे हे आहे महत्त्व

- Advertisement -

भगवान श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी कंस मामाने पुतना मावशीला पठविले होते. पुतनाने विषारी दूध पाजताना श्रीकृष्णाने तिचा वध केला. यानंतर पुतनाचा मृतदेहाची लोकांनी धिंड काढली. यावेळी लोकांनी घरातील टाकावू वस्तू व पळसाच्या झाडाच्या फांदी रोगराई, ‘ईडा पीडा घेऊ जागे मारबत’, अशा घोषणा देत गावाबाहेर तिच्या मृतदेह जाळण्यात आला होता, अशी अख्यायिका आहे.

हेही वाचा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोषमुक्त, 2014 च्या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय

काय आहे काळ्या मारबतीचे महत्त्व

- Advertisement -

स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या अत्याचारांनी जनता त्रसली होती. यात नागपूरमध्ये इंग्रजाविरोधात संघर्ष सुरू असताना भोसले घराण्यातील बाकायबाईने इंग्रजांशी हातमिळवणी केली. यावेळी लोकांना बाकाबाईचा विरोध करण्यासाठी 1881 पासून बाकाबाईचा पुतळा तयार करून काळी मारबत काढण्यात आली. मारबत उत्सवला 1942 मध्ये इतवारी परिसरात दंगल झाली होती. यात 5 जण गोळीबारीत ठार झाली होती.

हेही वाचा – नवनीत राणा-यशोमती ठाकूर वादात आमदार बच्चू कडूंची उडी, म्हणाले…

काय आहे पिवळ्या मारबतीचे महत्त्व

तेली समाजाकडून 1885 मध्ये जागनाथ बुधवारीमध्ये पिवळी मारबत उत्सवला सुरुवात करण्यात आली. इंग्रजांच्या विरोधात अनेक मुद्दयांना लोक एकत्र येतात. यानंतर समाजातील अनिष्ट चालीरितीवर मारबत उत्सवातून भाष्य केले जाऊ लागले.

- Advertisment -