Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र ठाकरे गटात प्रवेश करणारे शिशिर धारकर यांच्याबद्दल 'ही' गोष्टी माहीत आहे का?

ठाकरे गटात प्रवेश करणारे शिशिर धारकर यांच्याबद्दल ‘ही’ गोष्टी माहीत आहे का?

Subscribe

मुंबई : पेण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शिशिर प्रभाकर धारकर यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिशिर धारकर यांनी आज मातोश्री या निवासस्थानी पक्षप्रवेश केला. शिशिर धारकरांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर आगामी पेण विधानसभा निवडणुकीत उमेदवारी असल्याच्या चर्चार राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. कारण शिशिर धारकर यांची पेणमध्ये प्रभुत्व असल्याचे मानले जाते. शिशिर धारकर यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर पक्षाच्या ट्विटर हँडलने ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे माजी मंत्री प्रभाकर नारायण धारकर यांचे शिशिर धारकर हे ज्येष्ठ चिरंजीव असून, वडील राज्याच्या राजकारणात आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असताना शिशिर धारकर यांच्याकडे पेणमधील राजकारणाची सूत्रे हाती घेतली आहे. शिशिर यांनी अल्पावधीतच पेणच्या राजकारणावर पकड बसवली आणि त्यातूनच त्यांनी 1990  ते 1995 च्या कालावधीत नगराध्यक्षपदापर्यंत झेप घेतली. त्यानंतर रायगड जिल्ह्यात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या पेण अर्बन बँकेच्या अध्यक्षपदाची सुत्रेही प्रभाकर धारकर होते. यानंतर शिशिर धारकर यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. बँकेचा कारभार जोमात असतानाच बँकेला 13 वर्षांपूर्वी 758 कोटींच्या घोटाळ्याचे ग्रहण लागल्यानंतर शिशिर धारकर यांच्या वाट्याला वनवास आला. त्यानंतर त्यांची सीबीआयकडूनही चौकशीही झाली.

- Advertisement -

हेही वाचा – ‘आव आणणारे काही, डोळे वटारल्यावर पळून गेले’ उद्धव ठाकरेंची शिंदे आणि अजित पवारांवर टीका

आगामी विधानसभेत उमेदवारी मिळण्याच्या चर्चा

- Advertisement -

अलीकडे शिशिर धारकर पुन्हा एकदा सामाजिक कार्यात सक्रीय झाले. विशेष म्हणजे त्यांचे अनेक जुने आणि नवे सहकारी त्यांना येऊन मिळाले. ते कोणत्या पक्षात जाणार, यावर चर्चा सुरू होती. मध्यंतरी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित झाला. मात्र प्रवेशाचा मुहूर्त काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलला गेला आणि अखेर आज त्यांनी हातावर शिवबंधन बांधले. शिशिर धारकर यांचा मुलगा मिहिर यानेही शिवसेनेत प्रवेश केल्याने तोही राजकारणात सक्रीय होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिशिर धारकर यांच्या प्रवेशामुळे पेण, सुधागड, नागोठणे विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. तर दुसरीकडे बँकेच्या आर्थिक घोटाळ्यातील आरोपी असलेले शिशिर धारकर यांना शिवसेनेत उद्धव ठाकरे यांनी सहजपणे प्रवेश दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा – आता वाचाळवीरांच्या पंगतीत अजून एक नाव…, ठाकरे गटाचा भाजपाच्या ‘या’ नेत्यावर निशाणा

 जनसंपर्क वाढविण्याकडे लक्ष

दरम्यान, शिशिर धारकर यांना शिवसेना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार असल्याची चर्चा सुरू आहे. धारकर यांनीही त्यादृष्टीने गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात गाठीभेटी आणि जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. या मतदारसंघात जिल्हा सह संपर्क प्रमुख किशोर जैन हेही उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जातात. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ कोणता निर्णय घेतात, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -