घरताज्या घडामोडीठाकरे मंत्रिमंडळातील कोणत्या नेत्यावर तुमची नजर?, मुख्यमंत्र्यांनी 'त्यांच्या'कडे पाहिलं अन् म्हणाले...

ठाकरे मंत्रिमंडळातील कोणत्या नेत्यावर तुमची नजर?, मुख्यमंत्र्यांनी ‘त्यांच्या’कडे पाहिलं अन् म्हणाले…

Subscribe

एका खासगी वृत्त वाहिनीने ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरे मंत्रिमंडळातील कोणत्या नेत्याला तुम्ही मिस करताय?, असा प्रश्न विचारला असता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही. परंतु त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्याकडे पाहिलं आणि स्मितहास्य करत सांगू का?, असं म्हटलं.

एकनाथ शिंदे कार्यक्रमात बोलत असताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचं आगमन झालं. त्यावर शिंदेंनी आपलं बोलणं थांबवलं आणि अशोक चव्हाणांचा उल्लेख करत त्यांचं स्वागत केलं. मी वैयक्तिक काही बोलणार नाही. पण गेल्या अडीच वर्षात कॅबिनेटमध्ये कसे निर्णय व्हायचे हे त्यांनीही पाहिलं आहे, असं शिंदे म्हणाले. चव्हाणांनी मुख्यमंत्रिपद भोगलं आहे. मात्र, सगळं काही सांगायचं नसतं. उगाच कुणाचं नाव घ्यायचो आणि त्यांना तिथं अडचण व्हायची, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी कुणाचंही नाव घेणं टाळलं.

- Advertisement -

राजकारणात होणारे आक्षेपार्ह विधान आणि टीकांबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली भावना व्यक्त केली. प्रत्येक नेत्यानं आपण लोकप्रतिनिधी आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे आपण काय बोलतो याचा परिणाम युवा पिढीवर होत असतो. प्रत्येकानं याचं आत्मपरिक्षण केलं पाहिजे. मी तर प्रत्येकाला तेच सांगतो की, टीकेला कामानं उत्तर द्या. आरोपांना कामानं उत्तर दिलं की, बाकी काही बोलावं लागत नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.


हेही वाचा : चित्रा वाघांचा आता सुळेंवर निशाणा; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, काय वेळ आलीय बघा!

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -