पुणेरी पत्रकाराचा डोनाल्ड ट्रम्पना प्रश्न; प्रश्नांनी सर्वजण झाले चकीत

पुणेरी पत्रकाराने डोनाल्ड ट्रम्पना थेट प्रश्न विचारल्याने व्हाइट हाऊसच्या पत्रकारकक्षात सर्वचजण चकित झाले आहेत.

american president donald trump
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ही जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हणून ओळखली जाते. त्यामुळे त्यांच्याबरोबर बोलताना किंवा त्यांना प्रश्न विचारताना लोक दहावेळा विचार करतात. पण, पुण्यात जन्मलेल्या एका भारतीय-अमेरिकन वंशाच्या पत्रकाराने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना असा काही थेट प्रश्न विचारला आहे की, व्हाइट हाऊसच्या पत्रकारकक्षात सर्वचजण चकित झाले आहेत.

कोणता विचारला प्रश्न?

शिरीष दाते असे ट्रम्प यांना रोखठोक प्रश्न विचारणाऱ्या भारतीय अमेरिकन वंशाच्या पत्रकाराचे नाव आहे. त्यांनी विचारले की, ‘मिस्टर प्रेसिडंट आज तीन-साडेतीन वर्षानंतर, अमेरिकन जनतेशी तुम्ही जे खोटं बोलतात. त्याबद्दल तुम्हाला पश्चाताप वाटतो का?’ पत्रकाराकडून असा प्रश्न येताच ट्रम्प अस्वस्थ झाले आणि त्यांनी दाते यांना पुन्हा प्रश्न विचारण्यास सांगितले. त्यावर दाते यांनी त्यांना पुन्हा तोच प्रश्न केला. त्यानंतर ट्रम्प यांनी दाते यांच्या प्रश्नावर कोणतीही प्रतिक्रिया न देता दुसऱ्या पत्रकाराच्या प्रश्नाकडे वळले.

कोण आहेत शिरीष दाते?

शिरीष दाते हे भारतीय अमेरिकन वंशाच्या पत्रकाराचे नाव आहे. त्यांचा जन्म पुण्यात झाला आहे. ते हफिंगटन पोस्टचे प्रतिनिधी म्हणून व्हाइट हाऊसमध्ये उपस्थित होते. ‘तुम्ही जे खोटं बोलता, तुम्हाला तुमच्या अप्रमाणिकपणाबद्दल पश्चाताप वाटतो का?’ असा प्रश्न शिरीष दाते यांनी ट्रम्प यांना थेट विचारला. तसेच ‘मागच्या पाच वर्षांपासून मला ट्रम्प यांना हा प्रश्न विचारायचा होता’, असे टि्वट देखील दाते यांनी केले आहे.


हेही वाचा – Coronavirus: देशात कोरोनाचा उद्रेक! २४ तासांत ६५ हजार नव्या रुग्णांची नोंद