घरताज्या घडामोडीसंतापजनक! नराधम डॉक्टरने गर्भपात करून अर्भकाचे केले तुकडे!

संतापजनक! नराधम डॉक्टरने गर्भपात करून अर्भकाचे केले तुकडे!

Subscribe

डॉक्टरांच्या पथकाने हॉस्पिटलमध्ये जाऊन कारवाई केली.

अहमदनगरमध्ये एख संतापजनक घटना घडली आहे. डॉक्टर या शब्दाला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. आरोपी डॉक्टरने महिलेचा गर्भपात करून अर्भकाचे निर्घृणपणे पाच तुकडे केल्याचे समोर आले आहे.  या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अहमदनगर तालुक्यातील जखणगावात हा संतापजनक प्रकार घडला.

अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अखिलेश सिंह यांना निनावी फोन आला. त्यांनी गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरणबीकर यांना माहिती दिली. डॉक्टरांच्या पथकाने हॉस्पिटलमध्ये जाऊन कारवाई केली. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

डॉ. प्रदिप मुरणबीकर हे त्यांची टीम घेऊन  येथून जखणगाव येथे गेले तेव्हा त्यांना डॉक्टरकडे अनेक आक्षेपार्ह गोष्टी होत असल्याचं लक्षात आलं. यासंदर्भात पोलिस स्टेशनने गुन्हा नोंदवला आहे तसेच  कलम 312, 313, 315  अंतर्गत आता पुढची कारवाई होणार आहे. नगरमध्ये याआधीही गर्भपाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या भागात डॉक्टरांची टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी आणखी काही डॉक्टरांवर आपली नजर वळवली आहे.


हे ही वाचा – रामदेव बाबांच्या ‘कोरोनिल’ चं नेटकऱ्यांनी जोडलं थेट बॉलिवूडशी कनेक्शन!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -