घरताज्या घडामोडीपुढील ८ दिवस घराबाहेर पडू नका; शरद पवारांना डॉक्टरांचा सल्ला

पुढील ८ दिवस घराबाहेर पडू नका; शरद पवारांना डॉक्टरांचा सल्ला

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डॉक्टरांनी पुढील ८ दिवस घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. आज शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल होणार असून मंगळवारी शरद पवार यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डॉक्टरांनी पुढील ८ दिवस घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. आज शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करणार असून मंगळवारी शरद पवार यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मागील डिसेंबर महिन्यात शरद पवारांच्या एका डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर आता दुसऱ्या डोळ्यावरील शस्त्रक्रियेसाठी पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल होणार आहेत.

मंगळवारी शरद पवार यांच्या डोळ्यावर मोतीबिंदूचे ऑपरेशन होणार आहे. उजव्या डोळ्यावर मंगळवारी सकाळी १० वाजता मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होणार असून संसर्ग टाळण्यासाठी शरद पवारांना १८ जानेवारीपर्यंत सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे शरद पवार १८ जानेवारीपर्यंत कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावणार नाहीत. (doctor advice to Sharad Pawar take rest till January 18 Sharad Pawar admitted to Breach Candy Hospital for eye surgery)

- Advertisement -

उजव्या डोळ्यातील मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरद पवार यांना लगेचच घरी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील ८ दिवस ते त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी मुक्कामाला असणार आहेत. १८ जानेवारीपर्यंत शरद पवारांना घराबाहेर पडू नका असे डॉक्टरांनी म्हटले आहे. त्यामुळे घरातूनच ते पक्षाच्या कार्यक्रमाला अथवा बैठकीला हजर राहतील अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, या शस्त्रक्रियेमुळे शरद पवार हे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या पुस्तकाचे शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन होणार होते. मात्र, शरद पवारांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिल्याने ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवारांवर उद्या रुग्णालयात ऑपरेशन होणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल होणार असून उद्या पवारांच्या डोळ्यावर मोतीबिंदूचं ऑपरेशन होणार आहे. मागील डिसेंबर महिन्यात शरद पवारांच्या एका डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर आता दुसऱ्या डोळ्यावरील शस्त्रक्रियेसाठी पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल होणार आहेत.

नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. या आजारपणामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील शिबिराला उपस्थित राहतील की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, शरद पवार हे थेट रुग्णालयातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबीरासाठी उपस्थित राहिले होते.


हेही वाचा – झुकणं माझ्या रक्तात नाही…; पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -