घरमहाराष्ट्रडॉक्टरांकडून डिजिटल सह्यांचा गैरवापर सुरुच

डॉक्टरांकडून डिजिटल सह्यांचा गैरवापर सुरुच

Subscribe

पॅथॉलॉजीमध्ये उपस्थित न राहता वारंवार डिजिटल सह्यांचा गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. एमसीआयचे नियम धाब्यावर बसवून हे सर्व प्रकार सुरू आहेत.

रुग्णाचे आरोग्य अहवाल साक्षांकित करताना पॅथमध्ये सही करणारा तज्ज्ञ डॉक्टर प्रत्यक्ष उपस्थित असणे बंधनकारक असल्याचे एमसीआय म्हणजे राज्य वैद्यकीय परिषदेचा नियम सांगतो. पण, एकापेक्षा अधिक पॅथालॉजीमध्ये उपस्थित न राहता आरोग्य अहवालांवर सही करणाऱ्यांवर कारवाई केली जात असताना डिजिटल सह्यांचा गैरवापर होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. हे सर्व प्रकार एमसीआयचे नियम धाब्यावर बसवून सुरू आहेत. यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे समोर येत आहे.

टेक्नॉलॉजीचा गैरवापर

आरोग्य अहवाल देताना लॅबमध्ये डॉक्टर उपस्थित राहतो की नाही याबाबतची नोंद कुठेही नसल्याचे अशा तक्रारींमधून स्पष्ट होत आहे. आता एका पेक्षा अनेक लॅबमध्ये उपस्थित न राहता आरोग्य अहवालांवर डिजिटल सह्या केल्या जात आहेत. हा टेक्नॉलॉजीचा गैरवापर आहे. वेबबेस टेक्नॉलॉजीमध्ये ऑनलाईन आरोग्य अहवाल तपासले जात आहेत. असे करत असताना एका क्लिकवर त्या आरोग्य अहवालाला साक्षांकित केले जाते. या सॉफ्टवेअरमध्ये तशी सुविधा देण्यात आली आहे. पण, एमसीआयच्या नियमानुसार उपस्थित असलेल्या पॅथॉलॉजी लॅबमधीलच आरोग्य अहवालांवर तज्ज्ञ सही करू शकतो.

- Advertisement -

डिजिटल सही करताना डॉक्टर त्या ठिकाणी उपस्थित नसल्यास चालेल का?

डिजिटल सहीने आरोग्य अहवाल साक्षांकित करण्याचे प्रकार सध्या वाढीस लागल्याच्या तक्रारी दाखल होत आहेत. पुण्यातील रुग्णाच्या आरोग्य अहवालावर मुंबईत बसून सॉफ्टवेअर प्रणालीने डिजिटल स्वाक्षरी करू शकतो. हा आरोग्य अहवाल स्क्रीनवर तपासून एका क्लिकवर सही केली जाते. रुग्णाला मात्र डॉक्टर उपस्थित असून सही केली गेली असल्याचे भासवले जाते. डॉ. रोहित जैन या डॉक्टरने एमसीआयकडे डॉक्टरांच्या डिजिटल सह्यांबाबत विचारणा करून आरोग्य अहवालावर डिजिटल सही करताना डॉक्टर त्या ठिकाणी उपस्थित नसल्यास चालेल का? असा प्रश्न विचारला. त्यावर रुग्णाचा अहवाल ज्या पॅथॉलॉजीकडून देण्यात येतो, त्या ठिकाणी सही करणारा डॉक्टर उपस्थित असावा, असे एमसीआयकडून स्पष्ट करण्यात आले.

गुजरामधील एका प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक तज्ज्ञ डॉक्टराच्या उपस्थितीत आणि निरीक्षणाखाली आरोग्य अहवालावर सही करणे बंधनकारक आहे. तिथे उपस्थित नसतानाही तज्ज्ञ डॉक्टर रुग्णाला आरोग्य अहवालाबाबत निदान कसे करू शकतो हाच प्रश्न आहे. संबंधित प्रकरणाची तपासणी केली जाईल. – डॉ. शिवकुमार उत्तुरे, अध्यक्ष, राज्य वैद्यकीय परिषद

- Advertisement -

हेही वाचा – सिंहगड : तरूणीच्या खूनाप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -