Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र ड्रग्ज टाकून केकची विक्री, डॉक्टरला अटक

ड्रग्ज टाकून केकची विक्री, डॉक्टरला अटक

ड्रग्ज टाकून केकची विक्री, डॉक्टरला अटक

Related Story

- Advertisement -

ड्रग्जमिश्रीत केकची विक्री करणार्‍या एका डॉक्टरला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांनी अटक केली. रहमीन चरणीया असे या डॉक्टरचे नाव असून त्याच्याकडून या अधिकार्‍यांनी त्याच्याकडून दहा किलो हशीशमिश्रीत केक, काही ड्रग्ज आणि 1 लाख 72 हजार रुपयांची कॅश जप्त केली आहे. केक बनविण्यासाठी त्याने घरातच बेकरी बनविल्याचे उघडकीस आले आहे.

रहमीन चरणीया हा दक्षिण मुंबईतील एका प्रसिद्ध रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करत होता. झटपट पैशांसाठी त्याने ड्रग्जमिश्रीत केक बनवून त्याची विक्री करण्यास सुरुवात केल्याचे निष्पन्न झाले आहे. ड्रग्ज तस्करांविरुद्ध एनसीबीने विशेष मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम सुरू असताना दक्षिण मुंबईतील एक डॉक्टर घरात ड्रग्जमिश्रीत केक बनवून त्याची विक्री करीत असल्याची माहिती विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मिळाली होती. या माहितीनंतर एनसीबीच्या एका विशेष पथकाने माझगाव येथे सोमवारी रात्री सापळा लावून रहमीनला ताब्यात घेतले. त्याने घरातच केक बनविण्यासाठी एक बेकरी बनविली होती. त्याच्या घरातून या अधिकार्‍यांनी हशिशमिश्रीत केक, ड्रग्ज आणि कॅश जप्त केली. त्याच्याकडे या केकसाठी ऑनलाईन ऑर्डर येत होती. त्याचे पैसेही तो ऑनलाईन घेत होता. केक घेण्यासाठी तो ग्राहकांना त्याच्या घरी बोलावित होता.

- Advertisement -

केक किती खायचे हेदेखील तो ग्राहकांना सांगत होता. त्याच्या चौकशीत रमजान शेख याचे नाव समोर आले आहे. त्याला नंतर क्रॉफर्ड मार्केट परिसरातून ताब्यात घेण्यात आले. रमजान हा त्याला केकसाठी ड्रग्ज देण्याचे काम करीत होता. रमजानला कोण ड्रग्ज देत होते याचा आता तपास सुरू आहे. या दोघांना बुधवारी लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. केकची नशा सहा ते सात असते. त्यामुळे या केकची विक्री तो फक्त हायफाय पार्ट्यांसाठी करीत असल्याचे उघडकीस आले. दुसरीकडे एनसीबीने सोमवारी नालासोपारा येथून चुकवू ईमेका या नायजेरियन नागरिकाला तीन लाख रुपयांच्या कोकेनसह अटक केली, तो ड्रग्ज तस्करी करणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळीचा सदस्य आहे. चालू वर्षांत एनसीबीने आतापर्यंत सतरा नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे.

- Advertisement -