घरमहाराष्ट्रधक्कादायक! कमिशनऐवजी डॉक्टरांची औषध कंपन्यांकडे महिलांची मागणी

धक्कादायक! कमिशनऐवजी डॉक्टरांची औषध कंपन्यांकडे महिलांची मागणी

Subscribe

औषध कंपन्यांकडे कमिशनऐवजी डॉक्टरांनी महिलांची मागणी केल्याचे समोर आले आहे.

औषधी विक्री करणारे सेलसमन आणि डॉक्टर यांच्या संभाषमावर आधारीत पुण्याच्या साथी या संस्थेने एक अहवाल सादर केला आहे. या अहवालातूक एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालातून डॉक्टर औषधांच्या विक्री करणाऱ्या सेल्समनकडून कोणकोणत्या मागण्या करतात? डॉक्टर आणि औषध कंपन्याच्या काळ्या बाजारामुळे त्याचे रुग्णावर काय परिणाम होतात? हे या अहवालातून समोर आले आहे.

याठिकाणी करण्यात आले सर्वेक्षण

मुंबई, पुणे, नाशिक या महाराष्ट्रातील तीन शहरांसह देशातल्या लखनऊ, कोलकाता, हैद्राबाद अशा एकूण सहा शहरांमध्ये डॉक्टर आणि सेल्समन्सच्या संभाषणाचे सर्वेक्षण केले आहे. याबाबत अनेक मुलाखती घेण्यात आल्या असून यातून अनेक व्यवसायाच्या काळ्या बाजू समोर आल्या आहेत.

- Advertisement -

डॉक्टर आणि सेल्समनचे संभाषण

मी तुमची औषधे विकत घेतो. मात्र, याचा मला काय फायदा मिळणार. मला जास्तीत जास्त कमिशन द्या. त्यासोबतच परदेश वारीचे पॅकेजही द्या, अशा मागण्या केल्या जातात. त्यासोबतच अनेक डॉक्टरांकडून कमिशनऐवजी मुली किंवा महिला पुरवा, अशा देखील मागण्या करण्यात आल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

अनावश्यक औषधे खरेदी करावी लागतात

डॉक्ट आणि औषधविक्री करणाऱ्या कंपन्यांमधील या बनेल नात्यामुळे दरवर्षी तीमन हजार कोटीहून अधिक रकमेची अनावश्यक औषधे रुग्णाना खरेदी करावी लागत आहेत. यामुळे रुग्णांवर परिणाम होत आहे.

- Advertisement -

डॉक्टर अरुण गद्रे, डॉक्टर अर्चना दिवटे या दोन डॉक्टरांनी मुंबई – पुणे – नाशिकसह देशातल्या सहा शहरात अभ्यास केला आहे. याकरता फेडरेशन ऑफ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडियाच्या (FMRAI) वैद्यकीय प्रतिनिधींची मदत घेतली आहे.


हेही वाचा – भाजपमध्ये फूट पडणार? एकनाथ खडसेंच्या घरी तावडेंसोबत बैठक!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -