घरताज्या घडामोडीरुग्ण दगावल्याने नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण; रुग्णालयात तोडफोड 

रुग्ण दगावल्याने नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण; रुग्णालयात तोडफोड 

Subscribe
कोरोनासदृश्य रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण करत रुग्णालयात तोडफोड केली. ही घटना अंबड लिंक रोडवरील एका खासगी रुग्णालयात सोमवारी (दि.3) रात्री घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा सर्व डॉक्टरांनी निषेध केला असून आज (दि.4) सकाळी 10 वाजता आयएमए हॉल येथे बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.  त्यानंंतर सर्व डॉक्टर दुपारी 12 वाजता पोलिस आयुक्त विश्वास नागरे-पाटील यांची भेट घेणार असून  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहेत.
     गत आठवड्यात एक महिला कोरोनासदृश्य लक्षणे दिसून आल्याने खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. ही बाब नातेवाईकांना समजताच सर्वजण रुग्णालयात दाखल झाले. रुग्णाच्या मृत्यूनंतर अहवाल कोरोना निगेटिव्ह आला. याप्रकरणी नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण करत रुग्णालयात तोडफोड केली. या घटनेची माहिती पोलीस अधिकारी व डॉक्टरांना समजताच सर्वजण अंबड पोलीस ठाण्यात हजर झाले.
अंबड पोलिस ठाण्यामध्ये सोमवारी रात्री उशिरा वरिष्ठ पोलिस अधिकारी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजय खरात आणि सर्व डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष यांच्यासमवेत बैठक झाली. डॉक्टर संरक्षण कायद्यातील दुरुस्तीनुसार एफआयआर नोंदणी करण्यात आली असून अशा घटनांबाबत सर्व डॉक्टरांना सहकार्य करीत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी  सांगितले.
मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
रुग्णालयात नातेवाईक डॉक्टरला मारहाण करतानाची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. त्या आधारे नाशिक शहर पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध सुरू केला आहे. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संताप व्यक्त केला जात आहे.
निमा न्यू नाशिकतर्फे  निषेध
डॉक्टर मारहाणप्रकरणाची निमा न्यू नाशिकतर्फे निषेध करण्यात आला असून प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी . डॉक्टर व हॉस्पिटल्स यांना वेठीस धरू नये. विनाकारण बदनामी करू नये. कारवाईची धमकी देऊ नये. सर्व हॉस्पिटल्स व डॉक्टरांना संरक्षण पुरवावे. या घटनेतील आरोपीना शासन व्हावे, या मागण्यांसाठी आज (दि.4)  सकाळपासून पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत सर्व डॉक्टर सभासदांनी आपली ओपीडी व आयपीडी बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -