घरमहाराष्ट्रदीड कोटींच्या खंडणीला वैतागून डॉक्टरची आत्महत्या, लातूर जिल्ह्यातील घटना

दीड कोटींच्या खंडणीला वैतागून डॉक्टरची आत्महत्या, लातूर जिल्ह्यातील घटना

Subscribe

एका डॉक्टरने दीड कोटींच्या खंडणीच्या (ransom) मागणीला वैतागून आत्महत्या (doctor committed suicide) केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आरोपीला पोलीसांनी अटक केले असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही घटना लातूर जिल्ह्यातील खर्डा येथील आहे. डॉ नामदेव गिरी असे मृत डॉक्टरचे नाव असून त्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन वाढवणा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

काय आहे प्रकरण – 

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये उदगीरतल्या महेशकुमार जिवणेंनी त्यांच्या आई शांताबाई त्र्यंबकराव जिवणेंना उदयगिरी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान शांताबाई जिवणे यांचा मृत्यू झाला होता. जुलै 2021मध्ये महेशकुमार जिवणे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केली होती. रुग्णालयात उपचार करताना त्यांच्या आईला डॉ. नामदेव गिरी आणि डॉ. माधव चंबुलेंनी संगनमत करुन उपचारासाठी बनावट भेसळयुक्त रेमडीसीवर इंजेक्शन दिले. हे इंजेक्शन खरे असल्याचे भासवून त्यांची 90 हजारांची फसवणूक केल्याची तक्रार केली होती.या प्रकरणात डॉ. माधव चंबुले व डॉ. नामदेव गिरी या दोघांविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 420, 274, 275, 276, 34 नुसार गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा मागे घेण्यासाठीतक्रारदार महेशकुमार जिवणे व विकास देशमाने यांनी डॉ. नामदेव गिरी यांच्यांकडे दीड कोटींच्या खंडणीची मागणी केली होती

राहत्या घरी मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या –

- Advertisement -

तक्रारदार महेशकुमार जिवणे व विकास देशमानेंच्या मानसिक त्रासाला कंटाळून डॉ नामदेव गिरी यांनी 25 मे रोजी सांयकाळी खेर्डा येथील त्यांच्या राहत्या घरी शेतातील पिकावर फवारणीचे औषध प्राशन केले होते. यानंतर त्यांना उपचारासाठी उग्णालयात दाखल केले होते. मात्र, मंगळवारी डॉ. गिरी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पत्नीने दिली तक्रार – 

खंडणीची रक्कम न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन देऊन मानसिक त्रास दिल्याची तक्रा डॉ गिरींच्या पत्नी सुनंदा गुरी यांनी वाढवणा पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीवरून डॉ नामदेव गिरी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी महेशकुमार जिवणे याला वाढवणा पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. बुधवारी आरोपीला उदगीर न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या पकरणात दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -