घरताज्या घडामोडीचिंताजनक: मुंबईत आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं

चिंताजनक: मुंबईत आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं

Subscribe

मुंबईतील खासगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसागणीक वाढत आहेत. मंबईत रुग्णांचं प्रमाण सर्वाधिक आहे. दरम्यान, आता डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. मरीन लाइन्स येथील बॉम्बे रुग्णालयातील तंत्रज्ञ, ग्रँट रोडमधील भाटिया रुग्णालयाच्या ११ परिचारिका आणि दादरमधील शुश्रुषा हॉस्पिटलच्या आणखी चार परिचारिका आणि दोन डॉक्टरांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की आम्ही (बॉम्बे) रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधत आहोत. ज्या विभागात तंत्रज्ञ तैनात होते तो विभाग रुग्णालयाच्या मुख्य इमारतीपासून खूप दूर आहे. त्यामुळे रुग्णालय सील करण्यास नकार दिला.


हेही वाचा – इबोलाचं औषध गुणकारी; ६८ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज लागत नाही

- Advertisement -

दुसरीकडे, पुण्यामध्ये गेल्या २४ तासात कोरोना विषाणूची कमीतकमी ३७ प्रकरणे नोंदली गेली आहेत. यानंतर जिल्ह्यात कोविड -१९ संक्रमित लोकांची संख्या वाढून ३१३ झाली आहे. सोमवारी एका अधिकाऱ्याने सांगितलं की, गेल्या २४ तासात कोरोना विषाणूमुळे आणखी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे मुंबईनंतर राज्यात सर्वात जास्त बाधित जिल्हा आहे. त्यांनी सांगितलं की कोविड -१९ मुळे आतापर्यंत ३४ लोकांचा मृत्यू झाला आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नगरपालिकेच्या अखत्यारीतील भागातून ३३ रुग्ण आढळले आहेत, तर पिंपरी-चिंचवडमधील चार जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -