घरताज्या घडामोडीऔरंगाबादेतील घाटी रुग्णालयाचे निवासी डॉक्टर संपावर

औरंगाबादेतील घाटी रुग्णालयाचे निवासी डॉक्टर संपावर

Subscribe

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला औरंगाबादेतील घाटी रुग्णालयाचे निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्यामुळे सध्या घाटीचे रुग्णालयाचे डॉक्टर संपावर असल्याचे समोर येत आहे.

कोरोनाचे संकट आल्यापासून डॉक्टर रात्रंदिवस स्वतःच्या जीवाची परवा न करता काम करत आहेत. अशा परिस्थितीत औरंगबादमधील घाटी रुग्णालयातील डॉक्टरांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालं नाही आहे. यामुळे डॉक्टर संपावर गेले आहेत. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात ३९० निवासी डॉक्टर आहेत. मात्र त्यामध्ये कोविड सेंटरमध्ये काम करणार डॉक्टर आहेत ते संपावर गेले नसून ते आपले काम चालू ठेवणार आहेत. याबाबत त्यांच्या अध्यक्षांच्या वतीने सांगण्यात आले आहे. पण जे उर्वरित डॉक्टर आहेत ते संपावर गेले आहेत. पगार मिळेपर्यंत कामावर परतणार नाही, असा डॉक्टरांनी इशारा दिला आहे.

- Advertisement -

शुक्रवारी औरंगाबाद जिल्ह्यात नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ६१५ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यतील ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची स्थिती गंभीर असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. लवकर निदान झाल्यास उपचार करणे शक्य होत असल्याने ग्रामीण भागात आजारपण अंगावर काढू नका, असा सल्ला दिला जात आहे.


हेही वाचा – मुंबईसह राज्यात पुढील चार दिवस जोरदार पाऊस: समुद्रात ४.६७ मीटर उंच लाटा उसळणार!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -