घरताज्या घडामोडीअमानुषपणाची हद्द! लोखंडी रॉडने कुत्र्याला केली बेदम मारहाण

अमानुषपणाची हद्द! लोखंडी रॉडने कुत्र्याला केली बेदम मारहाण

Subscribe

लोखंडी रोडने कुत्र्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

माथेफिरुंनी एका हत्तीच्या अंगावर जळता टायर टाकल्याची घटना ताजी असताना एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. भटक्या कुत्र्यांना रॉडने मारहाण केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावार मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. ही घटना २५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे उघडकीस आले आहे. या मारहाणीत कुत्रा जखमी झाला असून त्याच्यावर कोंढव्यातील प्राण्यांच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नेमके काय घडले?

पुण्याच्या नाना पेठेत काही मुलांना कुत्रा जखमी अवस्थेत आढळून आला. त्या कुत्र्याच्या मानेवर, डोक्यावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या होत्या. तसेच रक्तस्त्राव होत होता. हे पाहताच दोन तरुणांनी त्या कुत्र्याला तात्काळ उचलून जवळील कोंढव्याच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी कुत्र्यावर प्रथमोपचार करुन मुलांकडे हा जखमी कुत्रा कुठे आढळून आला याची विचारणा केली. त्यावेळी हा जखमी अवस्थेत कुत्रा नाना पेठेतील हलवाई चौकात आढळून आल्याचे सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा धक्कादायक प्रकार २५ फेब्रुवारीला घडल्याचे उघडकीस आले. तसेच हे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये २५ ते ३० वयोगटातील दोन तरुण दिसत असून हे तरुण लोखंडी रोडच्या सहाय्याने कुत्र्याला मारहाण करत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून प्राणी प्रेमीतून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – पुण्यातील नाईट कर्फ्यू १४ मार्चपर्यंत वाढला


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -