घरठाणेDombivali Fire : डोंबिवलीमधील देशमुख होम्स परिसरात भीषण आग, 30-40 गोडाऊन जळून...

Dombivali Fire : डोंबिवलीमधील देशमुख होम्स परिसरात भीषण आग, 30-40 गोडाऊन जळून खाक

Subscribe

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली पूर्वेकडील टाटा पॉवर गोळवली येथील देशमुख होम्स परिसरात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास लागलेली ही आग अद्यापही विझली नसून अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांमध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल भिवंडीतील वलपाडा परिसरात भंगाराच्या गोदामाला आग लागली होती. या आगीत 4 भंगाराची गोदामे आणि 4 दुकाने जळून खाक झाली होती. ही घटनेला काही तास उलटताच आता ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली पूर्वेकडील टाटा पॉवर गोळवली येथील देशमुख होम्स परिसरात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास लागलेली ही आग अद्यापही विझली नसून अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. (Dombivli Fire : Massive fire in Deshmukh Homes area in Dombivli, 30-40 godowns gutted)

हेही वाचा…Fire News : भिवंडीत वलपाडा परिसरात भंगारच्या गोदामाला आग, लाखो रुपयांचे नुकसान

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेकडील टाटा पॉवर गोळवली येथील देशमुख होम्स परिसरात मध्यरात्री दोन ते तीन वाजता भीषण आग लागली. या घटनेनंतर तत्काळ अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. पण भंगाराचे गोडाऊन असलेल्या या परिसरात आगीने पेट घेत क्षणार्धात रौद्ररुप धारण केले. ज्यामुळे अग्निशमन दलाला ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. त्याशिवाय, आतापर्यंत 10 ते 12 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर, आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली? याचे कोणतेही कारण समोर आलेले नसून या आगीमुळे सकाळी परिसरात धुरांचे लोट पसरले आहेत.

टाटा पॉवर गोळवली भागात पत्रे ठोकून भंगारांचे गोडाऊन उभे करण्यात आले होते. या गोडावूनमध्ये ठाणे जिल्ह्यातील अनेक उपनगरामध्ये भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तींकडून कापडाचा चिंध्या, प्लास्टिकच्या बॉटल, पिशव्या, लाकडी सामान घेऊन या गोडाऊनमध्ये ठेवले जात होते. त्यानंतर प्लास्टिकपासून विविध प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांना हे प्लास्टिक दिले जात होते. यासाठी या भागात 30 ते 40 गोडाऊन उभारण्यात आले होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या बॉटल ठेवण्यात येत होत्या. याच प्लॅस्टिकने पेट घेकल्यामुळे आगीने रौद्र रुप धारण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाल होते. कल्याण, भिवंडी, उल्हासनगर , अंबरनाथ परिसरातून सात ते आठ अग्निशमन दलाच्या गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या आहेत. आगीच्या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन विभागाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पाण्याचे टँकर देखील मागवण्यात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आगीवर नियंत्रण आणण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. परंतु शार्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -