Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र उगीच मला ट्रोल करू नका; कंत्राटी पदभरतीवरील आरोपाचे घोंगडे अजित पवारांनी फेकले

उगीच मला ट्रोल करू नका; कंत्राटी पदभरतीवरील आरोपाचे घोंगडे अजित पवारांनी फेकले

Subscribe

सरकारनं कंत्राटी भरतीचा जीआर काढला. त्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरकारवर रोष व्यक्त केला. त्याचदरम्यान अजित पवार यांचं एक वक्तव्य खूप व्हायरल झालं आणि त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे. मला विनाकारण ट्रोल केलं जात आहे.

सरकारनं कंत्राटी भरतीचा जीआर काढला. त्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरकारवर रोष व्यक्त केला. त्याचदरम्यान अजित पवार यांचं एक वक्तव्य खूप व्हायरल झालं आणि त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे. मला विनाकारण ट्रोल केलं जात आहे. विरोधकांना उकळ्या फुटतात. ते काहीही व्हॉट्सअॅपवर शेअर करतात. कंत्राटी भरतीच्या मुद्यावर मला विनाकारण ट्रोल केलं जात आहे. नवीन भरती होईपर्यंत कंत्राटी भरती असा मागच्या काळातला निर्णय आहे, असं म्हणत अजित पवार यांच्यावर कंत्राटी भरतीवरून जो आरोप होत आहे तो त्यांनी फेटाळून लावला आहे. (Don t just troll me Ajit Pawar deny the allegations on contract recruitment)

कंत्राटी भरतीचा जीआर शासनानं काढल्यानंतर अजित पवार यांनी केलेलं एक वक्तव्य जोरदार व्हायरल झालं होतं. अजित पवार म्हणाले होते की, सरकारच्या एका कर्मचाऱ्याच्या पगारात खासगी क्षेत्रात 3-4 कुशल कर्मचारी काम करतात. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर जोरदार टीका केली  जात होती. यावर आता स्पष्टीकरण देत अजित पवार यांनी सांगितलं की, नवीन भरती होईपर्यंत ही कंत्राटी भरती असणार आहे. सोबतच आता लवकरच दीड लाख पदांसाठी भरती केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

गुरुवारी वेगवेगळ्या विभागांचा आढावा घेत असताना अनेक ठिकाणी कर्मचारी कमी आहेत हे लक्षात आले. काही ठिकाणी तात्काळ कर्मचारी आवश्यक आहेत. विशेषतः शिक्षण विभागात आहे. नवीन शिक्षक भरती लगेच करता येत नाही म्हणून आम्ही निवृत्त झालेल्यांना तात्पुरते घेतले आहे. तशापध्दतीने इतर विभागात सहा महिने किंवा वर्ष लागत असते. लगेच भरती केली तर कोण कोर्टात जातात. अनुशेषाचा प्रश्न असतो, बिंदूनामावली सांभाळावी लागते यामध्ये कुठल्याही घटकांच्या शंका- कुशंका राहता कामा नये त्यामुळे काही बाबतीत तातडीने लोकं लागतात म्हणून ते घेण्याकरता त्या काळात निर्णय घेतला गेला तो निर्णय मागच्या सरकारच्या काळातील आहे. त्या निर्णयावर कुणाकुणाच्या सह्या आहेत हे मी दाखवायला तयार आहे असे सांगतानाच आज ते सरकारमध्ये नाही मग लगेच आमच्या नावाने पावत्या फाडायचे काम सुरू झाले आहे. आम्हाला बदनाम करण्याचे काम सुरू झाले आहे. मी ३०-३२ वर्षे महाराष्ट्रात काम करतोय. तरुण – तरुणींचे काय प्रश्न आहेत. बेरोजगारीचे प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आहेत. ते दूर करण्यासाठी दीड लाख तरुण तरुणींची भरती करतोय हेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

काही जागांवर विशेष म्हणजे डॉक्टरांची जागा रिकामी झाली तर तिथे डॉक्टर द्यावा लागतो. म्हणून काही ठिकाणी तात्पुरत्या जागा नियमित भरेपर्यंत त्या जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. कायमचा नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अमित शहांचा मराठवाडा दौरा रद्द

- Advertisement -

मराठवाडा मुक्ती संग्रामाला 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यानिमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बोलावण्यात आलं होतं. मात्र, सG-20 च्या निमित्तानं सर्व प्रमुख नेते दिल्लीत आले होते. तसंच, लोकसभेसाठी 5 दिवसाचं अधिवेशन बोलवण्यात आलं आहे तसंच, कामाचं व्याप अधिक असल्यानं अमित शहा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

अजित पवारांचा मिश्किल टोला 

शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणीवरून प्रश्न विचारला असता, अजित पवार यांनी एक मिश्किल टोला लगावला आहे. ठाकरे आणि शिंदे गटाची कशी तयारी सुरूय असं विचारल्यावर अजित पवार म्हणाले की, ते त्यांना माहित असणार ना. कोणी किती जोर काढल्या कोणी किती बैठका मारल्या हे मी कसं सांगणार…असं म्हणत त्यांनी मिश्किल उत्तर दिलं आहे.

तर सुप्रिया सुळे या खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमादरम्यान भावूक झाल्याबद्दल विचारले असता, अजित पवार हे काहीही न बोलता तिथून निघून गेले.

(हेही वाचा: उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता आदित्यही शेतीच्या बांधावर; मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी साधणार संवाद )

- Advertisment -