Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र लसीकरण करण्याआधी रक्तदान करा, डॉ. राजेंद्र शिंगणेंचे रक्तदात्यांना आवाहन

लसीकरण करण्याआधी रक्तदान करा, डॉ. राजेंद्र शिंगणेंचे रक्तदात्यांना आवाहन

लसीचा पहिला डोस घेण्यापूर्वी रक्‍तदात्यांनी रक्‍तदान करावे

Related Story

- Advertisement -

०१ एप्रिल २०२१ पासून ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना लस देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. राष्ट्रिय रक्त संक्रमण परिषद यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना लसीची शेवटची मात्र घेतल्यानंतर २८ दिवसांपर्यंत त्यांना रक्तदान करता येणार नाही. यामुळे लस घेतल्यानंतर रक्तदान करण्याकडे रक्तदात्यांचा कल कमी होईल व राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात नेहमीच रक्‍ताचा तुटवडा भासतो. आता रुग्णालयामध्ये कोविड आणि नॉन कोविड अशा दोन्ही रुग्णांवर उपचार केले जात असल्याने अधिकाधिक रक्तदात्यांची आवश्यकता आहे.

त्यातच कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर २८ दिवसांपर्यंत रक्‍तदान करता येणार नसल्याने दुहेरी संकट निर्माण होणार आहे. सध्याची रक्‍तसाठयाची परिस्थिती बघता ५ ते ७ दिवस पुरेल एवढाच रक्‍तसाठा उपल्ब्ध आहे. संभाव्य परिस्थीती बघता कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेण्यापूर्वी रक्‍तदात्यांनी रक्‍तदान करावे, असे आवाहन राज्याचे मंत्री, अन्न व औषध प्रशासन, डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जनतेस केले आहे.

विकेंडला राज्यात कडक लॉकडाऊन राहिलं – नवाब मलिक

- Advertisement -

शुक्रवारी रात्री ८ वाजता म्हणजे ९ एप्रिलपासून हा लॉकडाऊन सुरु होईल आणि सोमवारी सकाळी हा लॉकडाऊन संपेल असा निर्णय झाला आहे. यानिर्णयामुळे कोणतेही राजकीय कार्यक्रम घेता येणार नाही. तसेच धार्मिक स्थळेही पूर्णपणे बंद राहणार आहेत. मात्र विविध धर्माच्या पुजारी, ट्रस्टी आणि धर्मगुरुंना त्यांच्या धर्मानुसार विधी पार पाडण्याची मुभा देण्यात आल्या होत्या त्या मुभा असणार आहे.

या राज्यामध्ये कोरोना गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने मुख्यमंत्र्यांनी मीडियातील मुख्य लोकांशी संवाद साधला. तसेच इंडस्ट्रीतील मुख्य लोकांबरोबर फिल्म इंडस्ट्रीमधील मुख्य लोकांशी संवाद साधला. तसेच विरोधी पक्षनेत्यांशीही यावर चर्चा करण्यात आली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंशी पण मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. याचा हेतू एकचं आहे की, कोरोना विषाणूशी लढत असतानाच संपूर्ण राज्यात एकजूट दिसली पाहिजे. आणि निश्चित रुपाने आम्हाला अपेक्षा आहे. ज्याप्रमाणे कोरोना आकडेवारी वाढत आहे. ५० हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहे. याच गतीने रुग्ण वाढत राहिले तर आरोग्य सेवेत कमतरता भासेल ही वस्तूस्थिती आहे. त्यासाठी ही बैठक झाली. या बैठकीत कडक नियमावली तयार करण्यात आली. तसेच या विकेंडला राज्यात कडक लॉकडाऊन राहिलं.

- Advertisement -