पुणे : ‘फोटोवर प्रश्न विचारू नका, विकासाच्या मुद्यावर प्रश्न विचारा’, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवार हे आज पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना मराठा आरक्षण, लालबागच्या राजाच्या ठिकाणी होणार गर्दी, गोपीचंद पडळकर यांची अजित पवारांवर केलेली टीका, अमित शाहांच्या दौऱ्यावर अनुपस्थिती आदी मुद्यांवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्या फोटोबद्दल, पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर अजित पवार म्हणाले, “मला त्याच्याबद्दल काही बोलायचे नाही. तुम्ही ना याचा फोटो आणि त्याचा फोटो माझे ते काम नाही. तुम्ही मला विकासाबद्दल विचारा. इथल्या काही गोष्टींबद्दल विचारा. मी सातत्याने महाराष्ट्रात फिरत असताना. विकास करण्याकरिता आणि प्रश्न सोडविण्याकरिता मी आणि माझ्या सहकार्याने भूमिका घेतलेली आहे. माझे काम त्या पद्धतीने चालू आहे. मी माझ्या बैठकातून आढावा घेतोय. तुमच्याही लक्षात घेत असाल, तुम्ही पाहात असाल, महाराष्ट्राती वेगवेळे प्रश्न की, ज्याला गती देण्याची गरज आहे. त्यासाठी 15 दिवसाल आणि तीन आठवड्याला बैठका घेत असतो. या बैठकीत कोणते विकासकामे कुठे आणि काम थांबलेले आहे आणि काय अडचण आहे. या अडचणी सोडवण्याचे काम करतो. यासंदर्भा आढावा घेतल्यानंतर त्याचा चालणा मिलतो. आता निघडीचा प्रकल्प दिल्लीला पोहोचलेला आहे. आता फक्त एका मंत्र्याच्या सहीची गरज आहे. मी दिल्ला गेल्यानंतर त्या मंत्र्याला भेटून सही घेणार आहे. निघडी ते पार कार्तज, कार्तज आणि स्वारगेट याचे ही काम करण्याचे पिंपरी-चिंचवड कराचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी मी कामाला लागलो आहे.
वाचाळवीरांची संख्या वाढली
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे वारांवार खालच्या पातळीवर जाऊन तुमच्यावर टीका करत आहे, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “मी असल्या गोष्टीकडे लक्ष देत नाही,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. यानंतर आगामी काळात तुमचे स्वप्न पूर्ण होईल, असे तुम्हाला वाटते का?, पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “माझे काम चालू आहे. मी गेले ५१ला मला या शहराने खासदार केले. तेव्हापासून मी काम करतोय आणि मला कामाची आवड आहे. मी कामा करिता वेळ देतो. माझी पहाटेपासून कामाची सुरुवात होते. हे आपल्या देखील माहिती आहे. माला हा असे म्हटला, तो तसे म्हटले. आता वाचळवीरांची संख्याच वाढलेली आहे. त्यांच्या वक्तव्यावर आपण काही तरी वक्तव्य करावे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा नाही. आपण आपले काम करत राहायचे.”
हेही वाचा – ‘भावी मुख्यमंत्री’ बॅनरबाबत अजित पवार म्हणाले; “जोपर्यंत 145ची मॅजिक फिगर…”
माझा दौरा ठरलेला
अमित शाहांच्या दौऱ्याला तुम्ही अनुपस्थित होता, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “मी काल जसा 2२ तारखेला दिवसभर पिंपरी-चिंचवडला वेळ दिलेली होती. 25 तारखेला दिवसभर पुण्याला वेळ दिणार आहे. तसेच 23 तारखेला बारामतीला वेळ दिलेली होती. मी जसा बारामतीचे नेतृत्व करतोय. तशा बारामतीच्या पाच संस्था सयोग गृहनिर्माण संस्था, बारामती बँक, बारामती खरेदी संघ, बारामती दूध संघ, बारामती मार्केट कमिटी, यासंस्थाच्या वर्षातून एका बैठक असते आणि मला ते चुकवायची नव्हती. 15 दिवस आधी अजेंडा काढला जातो. मी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांच्या कामावर घातले. काल सायंकाळी बारामतीच्या गणेशोत्सवांच्या भेटी आणि तिथले काही कार्यक्रम होते. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत माझे ते काम सुरू होते.”
हेही वाचा – समोर एक ‘सवत’ दिमाखात उभी करून…, संजय राऊत यांची मोदी सरकारवर रोखठोक टीका
लालबागच्या राजाचं देशभरात लौकिक वाढल्याने गर्दीत वाढ
लाल बागचा राजात होणार गर्दी आणि लोकांसोबत होणार गैरवर्तनावर अजित पवार म्हणाले, “मी काल बारामतीमध्ये होतो. लालबागच्या राजाचे दर्शनासाठी गेलेल्या काही बंघिणींना भुवळ आली. दिवसेंदिवस लालबागचा राजा या गणेशोत्सवाचा देशपातळीवर नाव लौकिक वाढलेले आहे. मग मोठमोठे नेते आणि सेलिब्रिटी हे सर्व जण लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी जातात. लालबागचा राजा हा जागरुग गणराय आहे. तिथेल सर्व जण काळजी घेतात. सर्व जण तिथे जायाला लागल्यामुळे व्हिव्हिआयपीच्या भेटी वाढलेल्या आहेत. लालबागच्या मंडळाने व्हीव्हीआयपीसाठी वेगळी रांग आणि बाकीच्या करिता दुसरी रांग, असे आयोजन केलेले आहे. शेवटी लोकांची श्रद्धा असते. आपण तिथे जावे, भेट द्यावी, असे वाटत असते. या गर्दीचे नियोजन करण्याचे काम त्या गणेश मंडळाचे असते आणि त्यांना सहकार्य करण्याचे काम आमच्या पोलीस खात्याचे असते. पोलीस खाते ते काम करत आहे. गणेशाचे आगमन झाले आहे. यानंतर इद आणि नवोरात्र, दसरा आणि दिवाळी आहे. हे सर्व सण फार उत्साहाने आपण महाराष्ट्रीय लोक साजरे करतो. या सणांमध्ये सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येतात. यामुळे आपण जेवढी काळजी घेईला पाहिजे. तेवढी काळी राज्य सरकार घेत आहे.”