घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यास आश्चर्य वाटू नये'; राधाकृष्ण विखे पाटील...

‘संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यास आश्चर्य वाटू नये’; राधाकृष्ण विखे पाटील यांची जहरी टिका

Subscribe

नाशिक : संजय राऊत यांच्यावर काय भाष्य करणार? संजय राऊत यांची भविष्यवाणी कधी खरी झाली नाही. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, पुढे जाऊन त्यांचा पक्ष त्यांच्याबाबत काय करेल, माहिती नाही, असा सूचक वक्तव्य करत संजय राऊत म्हणजे वैफल्यग्रस्त झालेला माणूस असून काही दिवसांनी त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसेल, अशी खरमरीत टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी पुन्हा शिंदे फडणवीस सरकार पडणार असल्याचे वक्तव्य केले. यावर ते म्हणाले की, संजय राऊत यांच्यावर काय भाष्य करणार? संजय राऊत यांची भविष्यवाणी कधी खरी झाली नाही. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, पुढे जाऊन त्यांचा पक्ष त्यांच्याबाबत काय करेल, माहिती नाही. रोज सकाळी उठायचं आणि कोंबडयांप्रमाणे ओरडत बसायचे इतकंच त्यांचे काम आहे. पक्षाने पोपटपंची करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. संजय राऊतांना एवढं काय महत्व देता. काही दिवसांनी त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यास आश्चर्य वाटायला नको असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. कर्नाटक निकालावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, भाजपला खूप मोठा फटका नाही, मात्र पूर्ण निकाल आल्यावर चर्चा होईल. तसेच स्थानिक राज्याचे निवडणुकांचे विषय वेगळे असतात. त्यामुळे हा निकाल केंद्राशी जोडणे बरोबर नाही.

- Advertisement -

दरम्यान यावर ते म्हणाले कि, अँटी इन्कमबन्सीचा परिणाम जाणवतो. संपूर्ण निकाल आल्यावर केंद्रीय नेतृत्वाची प्रतिक्रिया येईल, असेही ते म्हणाले. दरम्यान विखे पाटील पुढे म्हणाले की, सीमा प्रश्न सोडवण्याची भूमिका भाजपची असून विरोधीपक्षाने यावर राजकारण केले. सीमा भागात देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभा घेतल्या असून सीमा भागातील नागरिकांनी भाजपावर विश्वास ठेवला. त्यानंतर विखे पाटील यांनी राज्यातील नव्या वाळू धोरणावर प्रतिक्रिया देताना म्हणाले कि, वाळू माफियांचा मोडकळीस काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही जो धोरण वाळू संदर्भात घेतले आहे, ते यशस्वी होईल. थोडा वेळ लागेल पण आम्ही यशस्वी ठरू असा विश्वास व्यक्त करत काही ठिकाणी याला वाळू माफिया अडचणी आणत आहेत. मात्र त्यांच्यावर ठोस कारवाईची सूचना अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. पुढील महिन्या भरात प्रत्येकांना वाळू 600 रुपयात मिळेल, अशी अपेक्षा राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -