माझा राग मुंबईवर काढू नका, कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा प्रस्ताव बदलू नका, उद्धव ठाकरेंची विनंती

आत्ता तर तिथे झाडं तोडून झाली आहेत. मधल्या काळात त्याही परिस्थितीत तिथे बिबट्या फिरतानाचा फोटो काही छायाचित्रकारांनी काढलेला आहे, तिथे वन्यजीवन आहे. असही उद्धव ठाकरे म्हणाले

uddhav thackeray

एकनाथ शिंदे यांनी काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी नव्या शिंदे सरकारला ‘माझा राग मुंबईवर काढू नका, कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा प्रस्ताव बदलू नका’ अशी आग्रहाची विनंती केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्यावर राग आहे ना तो माझ्यावर काढा. माझ्या पाठीत वार करा. पण मुंबईच्या काळजात कट्यार घसवू नका. माझा राग मुंबईवर काढू नका. आरेचा निर्णय त्यांनी बदलला त्याचं मला खरचं दुख होत आहे. ही कोणाचा खाजगी मालमत्ता नाही, तिथे कोण्या बिल्डरला आंदन देत नाही आहोत. तिथे पर्यावरणासाठी आवश्यक जंगल आणि वनराई होती ती एका रात्रीत….. रात्रीस खेळ चाले हे त्याच आता ब्रीद वाक्य आहे, एका रात्री झाडांची कत्तल झाली. असा टोला त्यांनी लगावला आहे.

जेव्हा संभ्रम निर्माण होतो तेव्हा ती गोष्ट टाळलेली बरोबर आहे

मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या प्रथम त्या निर्णयाला स्थगिती दिली होती, स्थगिती दिल्यानंतर मुंबईच्या विकासाच्या मी आड येत होतो का? तर अजिबात नाही. मी त्यांना कांजुरमार्गचा पर्याय सुचवला होता, ठीक आहे … कदाचित त्यांना वाटत असेल त्यांच बरोबर.. मला वाटत असेल माझ बरोबर… माझ म्हणजे माझं नाही तर मी पर्यावरण वाद्यांचा सोबत आहे, पर्यावरणाच्या सोबत आहे. जेव्हा संभ्रम निर्माण होतो तेव्हा ती गोष्ट टाळलेली बरोबर आहे, अस मतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कृपया करून माझा राग पर्यावरणावर काढू नका

कृपया करून माझा राग पर्यावरणावर काढू नका, मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका, कांजुरमार्गचा जो प्रस्ताव दिला आहे त्यात कुठेही अहंकार नाही. मी मुंबईकरांच्या वतीने हात जोडून विनंती करतो, आरेचा जो काही आपला आग्रह आहे तो रेटू नका. जेणेकरून पर्यावरणाला हानी पोहोचेल. अशी विनंतीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

आत्ता तर तिथे झाडं तोडून झाली आहेत. मधल्या काळात त्याही परिस्थितीत तिथे बिबट्या फिरतानाचा फोटो काही छायाचित्रकारांनी काढलेला आहे, म्हणजे तिथे वन्यजीवन आहे. झाडं कापल्यामुळे तेथील वन्यजीवन संपल अस नाही, मला धोका हाच वाटतो की, आत्ता तुम्ही आरेचा भाग घेतल्यानंतर कालांतराने तिथे रहदारी सुरु झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील वनजीवन हे धोक्यात येणार आहे, करता करता तिथे काहीच नाही काहीच नाही म्हणत मग आणखीन पुढे जाईल असं होणार नाही, पण जवळपास 800 एकर मुंबईतील जंगल आम्ही राखीव करून टाकलं आहे, असही उद्धव ठाकरे म्हणाले.

आरेचा जो निर्णय आहे तुम्ही कृपा करून रेटून घेऊ नका, कांजूरमार्गचा जो निर्णय आहे… आता वरती खाली सरकार तुमचेच आहे. जमीन कोणाची ही जमीन नागरिकांची आहे. आणि ही जमीन महाराष्ट्राच्या मुंबईच्या हितासाठी वापरा जेणेकरून आरेचा जो मर्यादीत वापर होणार होता. कांजुरला गेल्यानंतर… मी मागे आपल्याला बोललो होतो की, ती थेट अंबरनाथ, बदलापूरला जाऊ शकते. आरे कारशेडचा प्रस्ताव बदलू नका, अशी विनंती त्यांनी  मुंबईकरांच्या वतीने सरकारला केली आहे.


भाजपमध्ये ब्राह्मण नेत्यांचं खच्चीकरण, ब्राह्मण महासंघाचा आरोप