घरताज्या घडामोडीखचू नका, कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका; न्यायासाठी विरोधीपक्ष सोबत : अजित...

खचू नका, कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका; न्यायासाठी विरोधीपक्ष सोबत : अजित पवार

Subscribe

विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असताना उस्मानाबादचे शेतकरी सुभाष देशमुख यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मंगळवारी दुपारच्या सुमारास विधानभवनाच्या प्रवेशव्दारासमोर आत्मदहनाचा सुभाष देशमुख यांनी प्रयत्न केला. यामध्ये सुभाष देशमुख जखमी झाले होते.

विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असताना उस्मानाबादचे शेतकरी सुभाष देशमुख यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मंगळवारी दुपारच्या सुमारास विधानभवनाच्या प्रवेशव्दारासमोर आत्मदहनाचा सुभाष देशमुख यांनी प्रयत्न केला. यामध्ये सुभाष देशमुख जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सुभाष देशमुख यांची भेट घेतली. त्यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या तब्बेतीची आस्थेने चौकशी केली आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. (Dont get tired dont take any extreme step With the opposition for justice says opposition party leader Ajit Pawar)

कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नका, असा धीर देत, टोकाचे पाऊल उचलू नका अशी विनंती अजित पवार यांनी उस्मानाबादचे शेतकरी सुभाष देशमुख यांना केला. तसेच, न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्ष सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन अजित पवार यांनी देशमुख यांच्या कुटुंबियांना दिले.

- Advertisement -

शेतीच्या प्रश्नामुळे त्रस्त असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी सुभाष देशमुख यांनी मंगळवारी विधानभवनाच्या प्रवेशव्दारावर समोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यामध्ये सुभाष देशमुख काही प्रमाणात भाजले आहेत. त्यांना उपचारार्थ मुंबई येथील जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर बुधवारी सकाळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन शेतकरी सुभाष देशमुख यांची भेट घेतली. त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली. त्यांची अडचण जाणून घेतली.

शेतकऱ्यांना शिवछत्रपतींची शपथ देत आत्महत्या न करण्याचे आवाहन – मुख्यमंत्री

- Advertisement -

शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहिले असून, यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना शिवछत्रपतींची शपथ देत आत्महत्या न करण्याचे आवाहन केले आहे. “महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे. तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे. भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोटीच जन्माला आलेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचंच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राची देशाची भूक भागवत आहात. म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचा असेल, तर तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे. परंतु, अचानक नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना पाहून मन कासावीस होऊन जातं”, असे मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी म्हटले.


हेही वाचा – उपमुख्यमंत्री साहेब गोलमाल उत्तर देऊ नका; विधानसभेतच आमदार सुहास कांदे फडणवीसांवर भडकले

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -