Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र आम्हाला सोडून जाऊ नका!, मुख्यमंत्र्यांपुढे महिलेचा टाहो

आम्हाला सोडून जाऊ नका!, मुख्यमंत्र्यांपुढे महिलेचा टाहो

चिपळूण दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी जोडले हात, व्यापार्‍यांनीही मांडल्या व्यथा

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपळूणमध्ये आले असताना चिपळूणमधील व्यापार्‍यांनी त्यांच्यापुढे आपल्या व्यथा मांडल्या. एका महिलेने तर मुख्यमंत्र्यांसमोर टाहोच फोडला. आम्हाला आश्वासन नको, मदत हवी आहे. आम्हाला सोडून जाऊ नका, काहीही करा, आमदार, खासदारांचा दोन महिन्यांचा पगार द्या, पण आम्हाला मदत करा, असा टाहोच या महिलेने फोडला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दुपारी 1 वाजता चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेत पोहोचले. यावेळी त्यांनी गांधी चौकातील दुकानदारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा थांबून व्यापार्‍यांशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांची व्यापार्‍यांशी चर्चा सुरू असतानाच एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. ही महिला प्रचंड रडत होती. माझ्या दुकानाच्या छतापर्यंत पाणी गेले. होते नव्हते ते सर्व गेले. तुम्ही काहीही करा पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असे ही महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती. काही पण करा, आमदार, खासदाराचा दोन महिन्यांचा पगार फिरवा, असा टाहोही या महिलेने फोडला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हात जोडले आणि मदतीचे आश्वासन देऊन पुढे निघाले.

भास्कर जाधवांचा दम

- Advertisement -

सदर महिला टाहो फोडून मदतीची मागणी करत असताना शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी त्या महिलेला दम दिला. आमदार, खासदारांच्या दोन महिन्यांच्या पगाराने काहीही होणार नाही, असे दमदाटीच्या स्वरात भास्कर जाधव म्हणाले. तसेच तुझ्या आईला आवर, तुझ्या आईला आवर, असे त्या महिलेच्या मुलाला जोरात सांगितले.

- Advertisement -