मुंबई – शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. शिंदे गटात गेल्यापासून त्यांनी शिंदे गटाची हिरिहिरीने बाजू मांडली आहे. उद्धव ठाकरेंवरही अनेकदा बाण सोडले. आता शीतल म्हात्रे आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून ट्वीटरवॉर सुरू आहे. त्यामुळे उगाच मला बोलायला लावू नका, असा सज्जड दमच जितेंद्र आव्हाडांनी शीतल म्हात्रेंना दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांचा एक फोटो ट्विट केला होता. मालेगावात उद्धव ठाकरेंना उर्दूत शुभेच्छा देणारे पोस्टर लावण्यात आले होते. हीच का तुमची हिंदुत्त्ववादी विचारधारा? असा सवाल म्हात्रेंनी यावेळी विचारला.
ह्या मातीत छत्रपती शिवाजीमहाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवल होतं..
नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही?
*हीच का तुमची हिंदुत्वादी विचारधारा??*#उध्वस्त_ सेना #खांग्रेसची_चमचेगिरी #मालेगाव pic.twitter.com/5mrPtdc7ww— sheetal mhatre (@sheetalmhatre1) March 25, 2023
शीतल म्हात्रेंच्या याच ट्वीटला उत्तर देताना जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उर्दू भाषेतील बॅनर प्रसिद्ध केला. दुसऱ्यांवर ढकलायची तुमची सवय आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी शीतल म्हात्रेंना डिवचलं.
ह्याच्यावर बोला ताई .. खास तुमच्या माहिती साठी..कारण नंतर दुसऱ्यावर ढकलायची तुमची सवय आहे @sheetalmhatre1 https://t.co/64DVwmUXlp pic.twitter.com/fun4qGi3ej
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 26, 2023
एवढंच नव्हे तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी उर्दूत लिहिलेली गझलही त्यांनी पोस्ट केली.
“खुशी के दौर दौरे से है यां रंजों मुहन पहिले
बहार आती हैं पीछे और खिजां गिरदे चमन पहिले
मुहिब्बाने वतन होंगे हजारों बेवतन पहिले
फलेगा हिंद पीछे और भरेंगा अंदमन पहिले”ही गझल मुख्यमंत्र्यांचे दैवत विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानात असताना “उर्दूत” लिहिली आहे.अश्या अनेक गझल…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 26, 2023
उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर जितेंद्र आव्हाड त्यांच्या बचावासाठी आल्याने शीतल म्हात्रे यांनी पुन्हा त्यांच्यावर टीकास्त्र डागलं. मुंब्र्यात कधीही शिवजयंती साजरी न करणा-या जितेंद्र आव्हाडांना ट्विट चांगलाच झोंबलेलं दिसतयं… पण मला एक समजत नाही मी बॅनर उद्धवजींचा टाकलाय आणि धूर चक्क राष्ट्रवादीमधून आलाय, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.
मुंब्र्यात कधीही शिवजयंती साजरी न करणा-या जितेंद्र आव्हाडांना ट्विट चांगलाच झोंबलेलं दिसतयं… पण मला एक समजत नाही मी बॅनर उद्धवजींचा टाकलाय आणि धूर चक्क राष्ट्रवादीमधून आलाय… #उद्धव ठाकरे #ढोंगीहिंदुत्व https://t.co/akxd3fXhLC
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) March 26, 2023
या ट्वीटमुळे त्यांच्यातील ट्वीरवॉरला आणखी पेटला. “मला काम करताना गवगावा करण्याची सवय नाही … लोकान साठी कार्येक्रम करतो .. माझ्या मतदार संघात येऊन विचारा …. उघड्यावर लाज घालवणारे कृत्य मी करत नाही …. आठवतेना काय ते ढुं..ण काय तो दांडा… धूर कुठुन निघाला,” असं आव्हाड म्हणाले.
मला काम करताना गवगावा करण्याची सवय नाही … लोकान साठी कार्येक्रम करतो .. माझ्या मतदार संघात येऊन विचारा …. उघड्यावर लाज घालवणारे कृत्य मी करत नाही …. आठवतेना काय ते ढुं..ण काय तो दांडा… धूर कुठुन निघाला.. @sheetalmhatre1 https://t.co/ip9QEGcCsu
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 26, 2023
एकमेकांचे ट्वीट रिट्वीट करत शीतल म्हात्रे यांनी पुन्हा आव्हाडांना डिवचलं. पवारांची भाकरी खाऊन उद्धवजींची चाकरी करतात असा पलटवार म्हात्रेंनी केला.
पवारांची भाकरी आणि उद्दवजींची चाकरी
…. लगे रहो भाईजान https://t.co/8PqZq1dZLu— sheetal mhatre (@sheetalmhatre1) March 26, 2023
त्यावरही जितेंद्र आव्हाड यांनी म्हात्रेंना सज्जड दम दिला. तुम्हाला चिंता नसावी. उगाच बोलायला लावू नका. घरचा उपाशी बाहेरचा तुपाशी अशा शब्दांत आव्हाडांनी म्हात्रेंना प्रत्युत्तर दिलं.
त्याची आपल्याला चिंता नसावी..उगगाच बोलायला लावू नका,…घरचा उपाशी बाहेरचा तूपाशी …..@sheetalmhatre1 https://t.co/a5HLSZ9vSI
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 26, 2023