घरमहाराष्ट्रनाशिक...आम्हाला तोंड उघडायला लावू नका, महाराष्ट्रात स्फोट होतील; संजय राऊतांचा इशारा कोणाला?

…आम्हाला तोंड उघडायला लावू नका, महाराष्ट्रात स्फोट होतील; संजय राऊतांचा इशारा कोणाला?

Subscribe

Sanjay Raut News | मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना लाच देण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांची चौकशी आणि कारवाई सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात अनिल जयसिंघानी या व्यक्तीचं नाव सातत्याने चर्चेत येत असताना त्यांनी २०१४ मध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता, अशी माहिती काल पसरली. यावरून बराच गदारोळ झाला. यावरून आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना विचारले असता, आम्हाला तोंड उघडायला लावू नका, महाराष्ट्रात स्फोट घडतील, असा घणाघात केला. ते आज नाशिकमध्ये बोलत होते.

हेही वाचा –येत्या २६ तारखेला कळेल शिवसेना काय आहे; संजय राऊतांचं चॅलेंज

- Advertisement -

अनिल जयसिंघानी यांनी २०१४ मध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशाचे फोटो काल सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंवरून आज संजय राऊतांना विचारले असता ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबीयांचे कोणा-कोणासोबत संबंध आहेत हे बाहरे येईल. कोणाच्याही कुटुंबापर्यंत पोहोचायचं नाही, अशी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे. आम्ही घाणेरडं दळभर्दी राजकारण कधीच केलं नाही. महाराष्ट्रात फडणवीसांनी कटुता आणली. केंद्रात अमित शाह आणि नरेंद्र मोदींनी कटुता नेली. आजसुद्धा एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. अनिल देशमुख आणि मी तुरुंगात जाऊन आलो. नवाब मलिक तुरुंगात आहेत. आमच्यावर आरोप होतात तेव्हा ते खरे असतात. पण तुमच्यावर आरोप होतात तेव्हा ते खोटे असतात का. तुम्हीसुद्धा तुरुंगात जाल अशापद्धतीचे खटले चालले पाहिजेत. तुमचे कुटुंबही तुरुंगात जातील असे पुरावे आहेत. पण तरीही आम्ही तुमच्या कुटुंबापर्यंत पोहोचणार नाहीत, असं म्हणत आम्हाला तोंड उघडायला लावू नका, अन्यथा महाराष्ट्रात स्फोट होतील, असा घणाघात संजय राऊतांनी केला.

शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. पण प्रत्यक्षात शेतकरी आता रस्त्यावर आहे. एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्याचं प्रायश्चित्त सरकारने घेतलं पाहिजे. निसर्ग कोपलेला आहे. काल गिरपिटी झाली. शेतकरी अत्यंत हवालदिल आहे. आक्रोश करतोय. पण सरकार कोर्टबाजीमध्ये रमलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी थोडंसं राज्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आजही ते आपल्या गटातटाकडेच पाहत आहेत. मुख्यमंत्र्यांना संपूर्ण महाराष्ट्र तरी माहितेय का? शेतकरी, उद्योजकांचे प्रश्न त्यांना समजले आहेत का? हा प्रश्न आहे. याचं उत्तर नाहीच असेल. मुख्यमंत्र्यांना चिंता वाटते की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विकत घेण्यासाठी तयारी सुरू आहे. पण शिवसेनेला न्याय मिळेल. खरी शिवसेना कोण हे सामान्य जनताच ठरवेल असंही संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -