Omicron Variant: राज्यातील २८ जिनोम सिक्वेंसिंग अहवाल प्रतिक्षेत; घाबरून जाऊ नका, टोपेंचे विनंती

Corona vaccination Health Ministry rajesh tope denies reports of vaccine shortage in Maharashtra
Corona vaccination : लसीच्या तुटवड्यावर आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण, केली 'ही' मागणी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल, गुरुवारी भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटने प्रवेश केल्याचे जाहीर केले. कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन नवे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्राच्या वेशीवर ओमिक्रॉन आला आहे. त्यामुळे राज्य सरकार अधिक सतर्क झाले आहेत. राज्यात परदेशातून येणारे २८ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले असून त्यांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. जरी महाराष्ट्राच्या वेशीवर ओमिक्रॉन आला असला तरी सर्वांनी घाबरून जाऊन नका, अशी विनंती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी जे तीन सुत्र आहेत, त्याचे पालन करण्याचे आवाहन टोपे यांनी केले आहे.

काय म्हणाले राजेश टोपे?

आरोग्य मंत्री राजेश टोपे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘कर्नाटकमध्ये आढळलेल्या रुग्णांच्याबाबत केंद्राचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्यासोबत सविस्तर बातचित केली. कर्नाटकमध्ये आढळलेल्या दोन ओमिक्रॉनग्रस्तांपैकी एक रुग्ण रिकव्हर झाला असून दुसरा अजून अॅडमिट आहे. रुग्णांचे हाय रिस्क आणि लॉ रिस्क कॉन्टॅक्ट तपासले आहेत. एकाचे २२० पर्यंत कॉन्टॅक्ट तपासले असून त्यांचा निगेटिव्ह अहवाल आला आहे. तर दुसऱ्याचे १७५ कॉन्टॅक्ट तपासले असून त्यामधील ६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आता या ६ जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे की नाही? याची तपासणी केली जात आहे. ३०हून अधिक देशात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. संसर्गाचा वेग अधिक असला तरी कोणी गंभीर आजारी नाही आहे. तसेच कोणाला आयसीयू किंवा व्हेंटीलेटरची गरज नाहीये. या व्हेरियंटमुळे अजून एकही मृत्यू झाला नाहीये. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. कोविड अॅप्रोपिएड बिहेविअरचे पालन करा. ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी लस घ्या.’

तसेच पुढे टोपे म्हणाले की, ‘कर्नाटकमध्ये जरी ओमिक्रॉन व्हेरियंट आढळला असला तरी नाकाबंदी करण्याची गरज नसल्याचे राजेश भूषण आणि आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचे मत आहे. घाबरण्याचे कोणतेही कारण नाहीये. गंभीर लक्षणे दिसत नसून सौम्य लक्षणे दिसत आहेत. राज्यात एकूण २८ नमुन्यांची जिनोम सिक्वेंसिंग केली जात आहे. यापैकी कस्तुरबा गांधी रुग्णालयात १२ नमुन्यांची तपासणी होत असून १६ नमुन्यांची तपासणी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे येथे होत आहे.ट


हेही वाचा – ऑक्सिजन अभावी किती मृत्यू झाले याची माहिती महाराष्ट्राने दिली नाही; आरोग्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती