Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राज ठाकरेंबाबत 'पुतना मावशीचं प्रेम' दाखवू नका, प्रवीण दरेकरांचा राऊतांवर पलटवार

राज ठाकरेंबाबत ‘पुतना मावशीचं प्रेम’ दाखवू नका, प्रवीण दरेकरांचा राऊतांवर पलटवार

Subscribe

ते आज राष्ट्रवादीचा भोंगा म्हणून उत्तम भूमिका वठवत आहेत हे महाराष्ट्र पाहतोय. शिवसेनेचा राष्ट्रवादी पक्ष कसा वापर करून घेत आहे आणि शिवसेना कशी रसातळाला जात आहे हे निवडणुकीत, संघटनेत आणि जनतेच्या मनात दिसेल. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून संजय राऊत काम करत असल्याचं टीकास्त्रही प्रवीण दरेकरांनी डागलंय.

मुंबईः राज ठाकरे शिवसेनेत होते, तेव्हा तुम्ही काय प्रेम दिलंत ते सर्वांना माहीत आहे. त्यामुळे संजय राऊतांनी राज ठाकरेंबाबत पुतना मावशीचं प्रेम दाखवू नसल्याचा टोला भाजप नेते प्रवीण दरेकरांनी लगावलाय. प्रवीण दरेकरांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा 5 जूनचा नियोजित अयोध्या दौरा स्थगित केल्याची माहिती ट्विट करत दिली आहे. विशेष म्हणजे याच मुद्द्यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला होता. आता त्यालाच प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर दिलंय.

भाजपाने राज ठाकरेंसोबत असं का करावं? असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी अयोध्या दौऱ्यावरुन राज ठाकरेंना टोला लगावला होता. त्यावरही प्रवीण दरेकरांनी पलटवार केलाय. “कोण कोणाचा वापर करून घेतंय यावर संजय राऊतांनी बोलूच नये. ते आज राष्ट्रवादीचा भोंगा म्हणून उत्तम भूमिका वठवत आहेत हे महाराष्ट्र पाहतोय. शिवसेनेचा राष्ट्रवादी पक्ष कसा वापर करून घेत आहे आणि शिवसेना कशी रसातळाला जात आहे हे निवडणुकीत, संघटनेत आणि जनतेच्या मनात दिसेल. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून संजय राऊत काम करत असल्याचं टीकास्त्रही प्रवीण दरेकरांनी डागलंय.

- Advertisement -

दरम्यान, राज ठाकरे यांचा दौरा स्थगित झालेला असून, तो रद्द झालेला नाही. त्यामुळे ते अयोध्येचा निश्चितच दौरा करणार आहेत. पुण्यात होणाऱ्या सभेत ते सविस्तर बोलणार आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे, त्यानंतरच ते प्रतिक्रिया देतील, त्या आधीच अंदाज लावणे कठीण असल्याचंही प्रवीण दरेकरांनी सांगितलं.

तसेच राज ठाकरे आणि भाजपाचं काय होणार आहे हे लवकरच कळेल. आधी तुमच्या पक्षाची काय दुर्दशा होतेय तिकडे लक्ष द्या, असा खोचक टोला प्रवीण दरेकरांनी लगावलाय. “जनता काही मूर्ख नाही. संजय राऊतांचं शहाणपण अख्खा महाराष्ट्र पाहत आहे. महाविकास आघाडी सरकार बनत असताना राऊतांनी संपूर्ण शिवसेना शरद पवारांच्या पायाशी नेऊन ठेवण्याचं शहाणपण केलं असल्याचंही दरेकर म्हणालेत.


- Advertisement -

हेही वाचाः Raj Thackeray Ayodhya Visit : राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित; पुण्यातील सभेतून भूमिका करणार स्पष्ट

- Advertisment -