ओसामा बिन लादेनमुळे पाकिस्तानात थांबले लसीकरण, युनिसेफची तंबी

करोनासोबतच आणखी दुसरे संकट वाढवून घेऊ नका अशी तंबी युनिसेफने पाकिस्तानला दिली आहे.

osama
ओसामा

करोना व्हायरसच्या परिणामामुळे जगभरातील अब्जावधी लोक घरी अडकले आहेत. पण या काळात आपल्या छोट्या मुलांचे नियमित लसीकरण टाळत असल्याचे संयुक्त राष्ट्राची लहान मुलांसाठीची एजन्सी युनिसेफच्या निदर्शनास आले आहे. नियमित लसीकरण टाळणे हा सर्वात मोठा धोका होऊ शकतो असा ईशारा युनिसेफने आता दिला आहे.

करोनामुळे अनेक देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कॉलरा, पोलिओ यासारख्या आजारांचा विळखा पाकिस्तान, अफगाणीस्तान, डेमोक्रॅटिक रिपब्लिक कॉंगो, सोमालिया, फिलिपिन्स, सिरिया आणि साऊथ सुदान यासारख्या देशांना नियमित लसीकरण न केल्याचा मोठा फटका बसू शकतो असे युनिसेफचे म्हणणे आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नायजेरिया या देशांमध्येच पोलियोचे उच्चाटन झालेले नाही. करोना व्हायरसचा प्रसार वाढण्याआधीही पाकिस्तान हा लहान मुलांसाठीच्या लसीकरणाची समस्या भेडसावत होती. पाकिस्तानात लसीकरणाला विरोध होण्याचे कारण म्हणजे सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीने पाकिस्तानच्या अब्बोट्टाबाद येथे जेव्हा अल कायदाच्या नेता असलेल्या ओसामा बीन लादेनला शोधून काढण्यासाठी बोगस लसीकरण मोहीम राबवली तेव्हापासून पाकिस्तानाच लसीकरणाला विरोध होत आहे.

विकसनशील राष्ट्रांना मदत करणाऱ्या GAVI या संस्थेनेही नियमित लसीकऱण व्हायला पाहिजे असे सूचित केले आहे. आपण एकाचवेळी दोन संकटाचा सामना करू शकत नाही असे या संस्थेने स्पष्ट केले आहे. करोनाविरोधातील लढ्यासाठी आता पाकिस्तान ३.७ अब्ज अतिरिक्त कर्ज तीन वेगवेगळ्या कर्जपुरवठादारांकडून घेण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानात ११०० लोक करोनाची लागण झाल्यानंतर आणि ९ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. तसेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड (आयएमएफ) कडून तसेच जागतिक बॅंक आणि एशियन डेव्हलपमेंट बॅंक यांच्यामार्फतही पाकिस्तान आर्थिक सहाय्य मिळवू पाहत आहे. करोनाशी लढण्यासाठी पाकिस्तानने १.२ ट्रिलियन रूपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे.

पाकिस्तानात करोनाची सुरूवात झालेल्या सिंध प्रांतात आता करोनाच्या प्रसारावर नियंत्रण आले आहे. पण आता पंजाब, बलुचिस्तान, गिलगिट बलिस्तान आणि केंद्रशासित प्रदेशात मात्र करोनाच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.