Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona Vaccination: सोलापुरातील काही भागांमध्ये कोरोना लसीचे संपले डोस

Corona Vaccination: सोलापुरातील काही भागांमध्ये कोरोना लसीचे संपले डोस

लसीकरण केंद्राबाहेर लस नसल्याचे लागले फलक

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. तसेच कोरोना चाचण्या आणि कोरोना लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला कोरोना लसीचा पुरवठा केला जात आहे. पण सोलापुरात कोरोना लसीचा तुटवडा भासल्याचे चित्र समोर आले आहे. सोलापुरच्या काही भागांमध्ये कोरोना लसीचे डोस संपले आहेत. त्यामुळे काही केंद्रांनी लसीकरण थांबले आहे. तसेच केंद्रांवर लस नसल्याचे फलक देखील लावण्यात आले आहेत.

आज सकाळी सोलापुरातील काही लसीकरण केंद्रांवर लस नसल्याचे फलक दिसून आले. यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ माजली. लसी कधी उपलब्ध होणार, असे प्रश्न उपस्थित होऊन लागले. पण कोरोना लसीचा साठा संध्याकाळी उपलब्ध होईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी फोनवरून दिली. लस नसल्या कारणाने आजचे लसीकरण सत्र रद्द करण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता सोलापुरात सकाळी सात ते रात्री आठपर्यंत सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा वगळता ग्रामीण भागातील दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील. तसेच वीकेंडला म्हणजेच शनिवार, रविवार या दोन दिवशी पूर्णतः लॉकडाऊन असेल. शुक्रवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी सातपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यादरम्यान कोणत्याही व्यक्तीला वैद्यकीय कारणाशिवाय आणि परवानगीशिवाय बाहेर फिरता येणार नाही. पण यादरम्यान उद्योगांना मुभा देण्यात आली आहे. कोरोनाचे सर्व नियमांची अंमलबजावणी करून उद्योग सुरू ठेवता येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काल रात्री दिली.


हेही वाचा – २५ वर्षांपुढील सर्वांना लस द्या; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती


- Advertisement -

 

- Advertisement -