Eco friendly bappa Competition
घर क्राइम धक्कादायक! पुण्यात दुहेरी हत्याकांड; आरोपीला पोलिसांकडून अटक

धक्कादायक! पुण्यात दुहेरी हत्याकांड; आरोपीला पोलिसांकडून अटक

Subscribe

पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुण्यात एकीकडे कोयता गँगने दहशत पसरवली असताना दुसरूकडे दुहेरी हत्याकांडाने पिंपरी-चिंचवड परिसर हादरल्याची समोर आले आहे.

पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुण्यात एकीकडे कोयता गँगने दहशत पसरवली असताना दुसरूकडे दुहेरी हत्याकांडाने पिंपरी-चिंचवड परिसर हादरल्याची समोर आले आहे. शहरातील दापोडी परिसरात असलेल्या बेसावध दाम्पत्यावर टीकावाने घाव घालून दुहेरी हत्या करण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी भोसरी पोलिसांनी प्रमोद मगरुडकर (47) या आरोपीला ताब्यात घेतले आहे. (double murder case bhosari police arrested accused in pune)

मिळालेल्या माहितीनुसार, दापोडीत बेसावध असलेल्या दाम्पत्यावर टीकावाने घाव घालून दुहेरी हत्या करण्यात आली आहे. शंकर नारायण काटे (60) आणि संगीता काटे (55) अशी हत्या झालेल्या पती-पत्नींची नावे आहेत. या हत्येनंतर आरोपी प्रमोद मगरुडकर रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फिरत होता.

- Advertisement -

पुण्याच्या (Pune) दापोडीत दुहेरी हत्याकांडाने (Double Murder Case) एकच खळबळ उडाली आहे. काटे दाम्पत्य हे त्यांच्या घरात बसले होते. तेव्हा, आरोपी प्रमोद त्यांच्यावर टिकावाचे घाव घातले. ही घटना शनिवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती मिळते.

दरम्यान, आरोपी प्रमोद हा हत्या करून रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर दिसला. हे पाहून नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ येऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्रमोद हा नुकताच दिल्लीवरून आलेला आहे.

- Advertisement -

स्थानिका नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. भोसरी पोलिसांनी तत्काळ येऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पुणे शहरात नोव्हेंबर 2022 मध्ये दुहेरी हत्याकांड झाले होते.

पुण्यातील पांडू लमाण वस्तीत अनिल उर्फ पोपट वाल्हेकर आणि सुभाष उर्फ किसन राठोड यांची हत्या झाली होती. चक्क तलवार आणि पालघन सारख्या धारदार हत्यारांनी दोघांवर वार करत त्यांचा खून करण्यात आला होता.


हेही वाचा – कोश्यारींच्या राजीनाम्यानंतर विरोधकांकडून महाराष्ट्राला न्याय मिळाल्याचा सूर

- Advertisment -