घरताज्या घडामोडीसंशयास्पद! पालघरच्या समुद्र किनाऱ्याजवळ आढळलेल्या बोटीत पाकिस्तानी नागरिक

संशयास्पद! पालघरच्या समुद्र किनाऱ्याजवळ आढळलेल्या बोटीत पाकिस्तानी नागरिक

Subscribe

जलराणी असे या बोटीचे नाव असल्याचे समजते. तसेच, या बोटीची नोंदणीही झालेली आहे. या बोटीत एकूण 15 जण सापडली होती. त्यामधील दोनजण पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती मिळाली.

पालघरमधील समुद्र किनाऱ्याजवळ संशयास्पद बोट आढळल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास ही बोट आढळली. विशेष म्हणजे या बोटीत पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती मिळते. पालघरपासून 44 नॉटिकल मैल अंतरावर ही बोट आढळली. (Doubtful Pakistani nationals in boat found near Palghar beach)

मिळालेल्या माहितीनुसार, जलराणी असे या बोटीचे नाव असल्याचे समजते. तसेच, या बोटीची नोंदणीही झालेली आहे. या बोटीत एकूण 15 जण सापडली होती. त्यामधील दोनजण पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती मिळाली. तसेच, 13 जण भारतीय नागरिक असल्याचे समजते. या सर्व नागरिकांची संध्या तपासणी पोलिसांकडून केली जात आहे.

- Advertisement -

पालघर समुद्र किनाऱ्याजवळ शनिवारी सकाळच्या सुमारास बोट सापडली. त्यानंतर सकाळी १० वाजता जॉइंट ऑपरेशन कमेटी बनवण्यात आली होती. तसेच, २६-११ च्या हल्लानंतर समुद्रातील संशयास्पद हालचालींवर नजर ठेवते त्यांच्याकडून आणि नेव्ही कडून मुंबई पोलिसांना आणि इतर एजेन्सींला माहिती देण्यात आली.

या माहितीनुसार, मुंबई किनाऱ्याजवळील लाईट हाऊस येथे एक संशयास्पद बोट आहे. या ठिकाणी आढळलेल्या या बोटीमध्ये दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती मिळताच सगळ्या यंत्रणा संक्रीय झाल्या यानंतर या बोटीचा शोध घेतला जात आहे. मुंबई पोलिसांची सागरी पोलिस टीम या बोटीचा शोध घेत आहे.

- Advertisement -

दरम्यान, गतवर्षी सप्टेंबर महिन्यात उरण येथील करंजाजवळच्या समुद्रात संशयास्पद मासेमारी बोट सापडली होती. विनानंबरप्लेट असलेली बोट सापडल्याने बोट ताब्यात घेण्यात आली. मत्स्य विभाग गस्त घालत असताना ही बोट सापडली. डिझेल चोरीसाठी बोट वापरण्यात येत असल्याचा संशय त्यावेळी व्यक्त केला जात होता.


हेही वाचा – मी गृहमंत्री झाल्याने अनेकांची अडचण; सुप्रिया सुळेंच्या टीकाला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -