घरताज्या घडामोडीVideo: 'राऊत साहेब अँजिओप्लास्टी कम्पाऊंडरकडून केली का? डॉक्टरांचा तमाशा करु नका'

Video: ‘राऊत साहेब अँजिओप्लास्टी कम्पाऊंडरकडून केली का? डॉक्टरांचा तमाशा करु नका’

Subscribe

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आपल्या बेधडक आणि रोखठोक वक्तव्यांसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. नुकतेच एबीपी माझा या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी ‘डॉक्टारांना काय कळतं? मी तर कम्पाऊंडरकडून औषध घेतो’ असे वक्तव्य केले होते. ज्यामुळे आता डॉक्टर वर्गाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. वैजापूरचे प्रसिद्ध डॉक्टर आणि लेखक अमोल अन्नदाते यांनी एक व्हिडिओ प्रतिक्रिया देऊन संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला असून राऊत यांच्याप्रमाणेच टोकदार प्रश्न उपस्थित केले आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते या व्हिडिओद्वारे म्हणाले की, “राऊत साहेब आपण काही दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी केली ती काय कम्पाऊंडरकडून करुन घेतली होती का? तुमच्या राजकारणासाठी डॉक्टरांचा तमाशा करु नका. लोक सध्या किड्या मुंग्यासारखे मरत आहेत, कोरोनाने थैमान घातले असताना राऊत यांचे डॉक्टरांबद्दलचे वक्तव्य संताप आणणारे आहे. कोरोनाकाळात आतापर्यंत २०० ते ३०० डॉक्टारंचा मृत्यू झाला आहे. सरकार डॉक्टरांचा सन्मान करु शकत नाही, तर कोरोना योद्धे वैगरे बोलणे देखील तुम्ही सोडून द्या.”

- Advertisement -

 

सजंय राऊत जे बोलतात ते प्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शब्द असतात, असे आम्ही समजतो. उद्धव ठाकरेंचे ते मुखपत्र आहेत. मग डॉक्टरांची अशी जाहीरपणे हेटाळणी योग्य आहे का? असाही थेट प्रश्न अन्नदाते यांनी उपस्थित केला. जर डॉक्टरांना काहीच कळत नसेल तर एक दिवस तुम्ही कोरोना वॉर्डात येऊन काम करुन दाखवा? किंबहुना सर्वच राजकीय नेत्यांना एक दिवस कोरोना वॉर्डात ड्युटी लावा, असे आव्हान देखील डॉ. अन्नदाते यांनी दिले.

- Advertisement -

खासदार संजय राऊत यांनी सामनातील अग्रलेख, रोखठोक सदर किंवा इतर माध्यमांना दिलेल्या मुलाखती असो.. राऊत एखादे तरी असे वक्तव्य करतात, ज्याने गोंधळ निर्माण होतो. मागे त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या प्रकटमुलाखतीमध्ये छत्रपतींचे वंशजावर टीकात्मक भाष्य केले होते. त्याचेही जोरदार पडसाद उमटले होते. नुकतेच त्यांनी सुशांतच्या वडीलांवर आरोप केले होते. त्याची देखील दखल घेतली गेली. त्यांच्या वक्तव्यावर वाद निर्माण झाले होते. संजय राऊत यांनी घेतलेल्या भूमिका या थेट शिवसेनेशी जोडल्या जातात, त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडत असते.

 

🙄

उद्धव ठाकरे यांचा मेडिकल,औषधे याचा अभ्यास दांडगा आहे. WHO ला काय कळतय ? – संजय राऊत पूर्ण लिंकhttps://youtu.be/4VVi3gvQvk0

Posted by Osmanabad – धाराशिव on Friday, August 14, 2020

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -