घरमहाराष्ट्रडॉ. अरुणा ढेरे यांची ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

डॉ. अरुणा ढेरे यांची ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

Subscribe

महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. अरुणा ढेरे आणि ना.धों.महानोर यांची नावे पाठवण्यात आले होते.

ज्येष्ठ लेखिक डॉ. अरुणा ढेरे यांची ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यवतमाळ येथे साहित्य महामंडळाची बैठक सुरु होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. अरुणा ढेरे आणि ना.धों.महानोर यांची नावे पाठवण्यात आले होते. रविवारी यवतमाळ येथे झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत सर्व मान्यवरांच्या एकमताने डॉ. अरुणा ढेरे यांचे नाव अध्यक्ष पदासाठी घोषित करण्यात आले. निवडणूकीशिवाय बिनविरोध संमेलनाध्यपदी विराजमान होणाऱ्या डॉ. अरुणा ढेरे पहिल्या अध्यक्ष आहेत. यवतमाळच्या पोस्टल मैदानावर ११, १२ आणि १३ जानेवारीला साहित्य संमेलन होणार आहे.

अशी झाली डॉ. अरुणा ढेरे यांची अध्यक्षपदी निवड

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने यावर्षी संमेलनाध्यक्ष पदाची निवड निवडणूक द्वारे न करता सन्माने करणार असल्याचे घोषित केले होते. त्यासाठी महामंडळाने चार घटक संस्थांकडून प्रत्येकी तीन नावे, संलग्न संस्थांकडून आणि विद्यमान संमेलनाध्यक्षांकडून प्रत्येकी एक नावे मागविले होते. यामध्ये मराठवाडा साहित्य परिषदेने आपली नावे माघारी घेतले होते. आज सर्वानुमते महामंडळाच्या बैठकीत डॉ. अरुणा ढेरे यांची अध्यक्षपदी निवड झाली.

- Advertisement -

‘या’ महिलांनी आतापर्यंत अध्यक्षपद भूषविले आहे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या डॉ. अरुणा ढेरे या पाचव्या साहित्यिका ठरल्या आहेत. याअगोदर चार महिलांनी अध्यक्षपद भूषविले आहे. यामध्ये १९६१ साली कुसुमावती देशपांडे यांनी ग्वाल्हेर येथील संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. १९७५ साली कराड येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद दुर्गा भागवत यांनी भूषविले होते. त्याचबरोबर १९९६ साली आळंदीच्या संमेलनात शांता शेळके यांनी तर २००१ साली विजया राजाध्यक्ष यांनी इंदोरच्या साहित्य संमेलनात अध्यक्षपद भूषविले होते.


हेही वाचा – ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठी साहित्यिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -