घरताज्या घडामोडी'आंबेडकरांनी दिलेल्या मार्गावर देश चालतोय, मात्र काही संकोचित वृत्ती अधोगतीच्या मार्गावर नेतायत'

‘आंबेडकरांनी दिलेल्या मार्गावर देश चालतोय, मात्र काही संकोचित वृत्ती अधोगतीच्या मार्गावर नेतायत’

Subscribe

पुण्यातील सिम्बायोसिस शिक्षण संस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील उपस्थिती होते. या कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता विरोधकांना टोला लगावला. ते म्हणाले की, आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मार्गावर देश चालला आहे. पण काही संकोचित वृत्ती खाली उतरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या सगळ्या संकोचित वृत्तींना आवाहन करतो की, आंबेडकरांनी जो मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गावर चालून आपण जर एका दिशेने निघालो तर येत्या १० वर्षात जगातील एक विकसित देश म्हणून आपण भारत देशाला प्रस्थापित करून शकतो.

एकही पैशाचा मोबदला न घेता केंद्राने महाराष्ट्र सरकारला इंदू मिलची जागा दिली

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मुख्यमंत्री झाल्यानंतर पवित्र दीक्षाभूमीच्या विकासाकरता महाराष्ट्र सरकारकडून १०० कोटी रुपये देऊन मोठ्या प्रमाणात काम घडवून आणले. डॉ. बाबासाहेब आंबडेकर महापरिनिर्वाणनंतर ज्या चैत्यभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व्हावे अशी अनेक वर्षांची मागणी होती. त्यात इंदू मिलच्या जागेची मागणी सातत्याने केली जात होती. कधी कधी दुर्दैव असे असते की, ज्या महामानवाने भारताला संविधान दिले आणि खऱ्या अर्थाने समतायुक्त समाजाची मुहूर्तमेढ ज्या संविधानाने केली, अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणनंतरच्या चैत्यभूमीवर त्याचे स्मारक व्हावे याकरिता १ इंच जागा उपलब्ध होऊ शकली नाही. पण मोदींचे आभार मानतो. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना घेऊन मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो. तीन दिवसात २३०० कोटी रुपयांची इंदू मिलची जागा एकही पैशाचा मोबदला न घेता महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बनवण्याकरता दिली. तात्काळ आम्ही काम चालू केले, लवकरच ते स्मारक पूर्ण होईल आणि खऱ्या अर्थाने चैत्यभूमी येणाऱ्या अनुयायांना महामानवाच्या कार्याचे आणि त्यांच्या विचारांचे दर्शन देखील घेता येईल.’

- Advertisement -

पुढे फडणवीस म्हणाले की, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनला घर होते, ज्या ठिकाणी आंबेडकरांनी राहून लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये अभ्यास केला आणि पीएचडी मिळवली ते तिथल्या कौन्सिलनी लिलावात काढले होते. अनेकांची मागणी होती, परंतु सरकार त्याबद्दल कुठला निर्णय करत नव्हते. मी मुख्यमंत्री झालो आणि त्यानंतर सांगण्यात आले की, लिलावातील शेवटचा टप्पा सुरू आहे आणि यानंतर ते घर पाडले जाईल. कोणाचा तरी बंगला तिथे तयार होईल. तात्काळ आम्ही त्याठिकाणी जाऊन मोदींची मदत घेतली आणि आंबेडकरांचे घर महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही विकत घेतले. त्या ठिकाणी स्मृती ठेवा आम्ही येणाऱ्या लोकांकरता ठेवला आहे. तसेच दुर्मिळ पत्र ठेवले आहेत. ते पत्र पाहिल्यानंतर असे समजत की, आंबेडकरांना जर्मन भाषा ज्ञात होती. जर्मन भाषेतील त्यांचे पत्र, पत्र व्यवहार ठेवण्यात आले आहेत. याशिवाय जपानच्या युनिव्हर्सिटीमध्ये आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मला मिळाली.

‘दरम्यान संकोचित वृत्ती सोडून आपण सगळ्यांनी एका मार्गाने विचार केला तर आपण या देशाला महान देश बनवू शकतो. आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मार्गावर देश चालला आहे. पण काही संकोचित वृत्ती खाली उतरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या सगळ्या संकोचित वृत्तींना आवाहन करतो की, आंबेडकरांनी जो मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गावर चालून आपण जर एका दिशेने निघालो तर येत्या १० वर्षात जगातील एक विकसित देश म्हणून आपण भारत देशाला प्रस्थापित करून शकतो. जे संविधान आपल्याला दिले आहे, त्यात देशासमोरच्या समस्यांचे उत्तर आहे आणि संविधानांची रचना करताना समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हे विचार त्यामाध्यमातून मांडले आहेत. त्या विचारांमुळे आमचा देश एक आहे, संधीची समानता ही जी प्रत्येकाला मिळतेय त्यातून समाजातला कोणी मागे राहणार नाही काळजी संविधानाने घेतली आहे,’ असे फडणवीस म्हणाले.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -